मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) लवकरच मुंबईतील 2500 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाणार आहे. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लॉटरीमध्ये मुंबईतील विविध घरांचा समावेश असेल. म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांनी काही दिवसांपूर्वी 10 दिवसांनतर मुंबईतील 2500 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढणार असल्याचं म्हटलं होतं. ही घरं विविध उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध असतील.


Mhada Lottery : म्हाडा मुंबईतील 2500 घरांसाठी लॉटरी काढणार


म्हाडाच्या नियमानुसार अर्जदारांची तीन गटात विभागणी केली जाते.  अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) या गटांसाठी घरं उपलब्ध करुन दिली जातील. अत्यल्प उत्पन्न गटासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा 6 लाख असेल. अल्प उत्पन्न गट मर्यादा 6 ते 9 लाख रुपये असेल. तर 9 लाख ते 12 लख रुपये उत्पन्न गट असणाऱ्यांसाठी मध्यम उत्पन्न गट असेल. तर 12 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल ते उच्च उत्पन्न गट असतील.


म्हाडानं  2025 मध्ये मुंबईतील घरांची लॉटरी काढली नव्हती. त्यापूर्वी 2024 मध्ये म्हाडाकडून लॉटरी 2000 घरांसाठी काढण्यात आली होती. त्यावेळी घरांची किंमत 29 लाख ते 6.82 कोटी रुपयांदरम्यान होती.


म्हाडाकडून संगणीकृत पद्धतीनं  विविध उत्पन्न गटातील अर्जदारांच्या यादीनुसार सोडत काढली जाते. म्हाडाची विविध मंडळं कार्यरत असून मुंबईशिवाय पुणेकोण, नाशिकसंभाजीनगर मंडळं देखील लॉटरी जाहीर करतात. म्हाडाची स्थापना 1977 मध्ये झाली होती. तेव्हापासून म्हाडानं 5.27 लाख घरं बांधली आहेत.


मागील लॉटरीतील पात्रतेच्या अटी


अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार विवाहीत असल्यास पती/पत्नी यांचे आधार कार्ड/ पॅन कार्ड,अर्जदार अविवाहीत असल्यास स्वतःचे आधार कार्ड/पॅन कार्ड.अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate) (अधिवास प्रमाणपत्र हे जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे व त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे.)




हेदेखील वाचा




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.