Mumbai Crime News : मिरा-भाईंदरमधील काशीमिरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय महिला घरकामगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमन नावाची ही महिला चंदेश अॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी चंदेश अॅकॉर्ड बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात तिची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले असून, तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काशीमिरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
नाशिकच्या मालेगावात मागील भांडणाची कुरापत काढून सात ते जणांच्या टोळक्याने एकावर लाठ्या - काठ्या, कोयता, तलवारीने सपासप वार करून ठार केले. मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सलीम शेख असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. मालेगावच्या अख्तराबाद भागातून सलीम शेख जात असताना सहा ते सात जणांनी त्याचा पाठलाग करून निर्दयीपणे त्याच्यावर वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृत सलीम शेख याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हल्लेखोराविरुद्ध पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.