पाकिस्तानला इस्लामाबाद मध्ये अमेरिका-इराण दरम्यान शांतता करारासाठी बैठक आयोजित करण्याची इच्छा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा प्रस्ताव दिला आहे. इराणचा जुना रेकॉर्ड आणि नवीन भूमिका पाहता इस्लामबादमध्ये बैठक होण्याची शक्यता नाहीय. पाकिस्तान इराणचा शेजारी देश आहे. दोन्ही देशांमध्ये 901 किलोमीटरची सीमा आहे.
अमेरिकीआउटलेट एक्सियोसनुसार, इस्लाबादमध्ये बैठक व्हावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेने यासाठी इराणला पाकिस्तानच्या माध्यमातून 15 अटींचा शांती प्रस्ताव पाठवला आहे. याच प्रस्तावाच्या आधारावर अमेरिकेला इराणसोबत चर्चा करायची आहे.
पाकिस्तानात बैठक न होण्यामागची तीन कारणं काय?
1 अमेरिका आणि इराणमध्ये मागच्या वर्षभरात आतापर्यंत दोनवेळा शांतता बैठकीचा प्रयत्न झाला आहे. एप्रिल 2025 मध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांचे दूत बैठकीसाठी एकत्र बसले. त्यावेळी अमेरिकेने वियनामध्ये बोलणी करण्याचं स्थान ठरवलं होतं. पण इराणने त्यात बदल केला. ओमानच्या मस्कतमध्ये ही बैठक झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये दोन्ही देशांमध्ये नव्याने चर्चा सुरु झाली. अमेरिकेने त्यावेळी तुर्कीमध्ये बैठकीचा स्थान ठरवलं होतं. पण इराणने पुन्हा ओमानची निवड केली. ओमान आणि जिनेवा येथे दोन्ही देशांमध्ये बैठक झाली.
हा रेकॉर्ड पाहता इराण कदाचितच इस्लामाबादमध्ये बैठकीला होकार देईल. कारण इस्लामाबादचा प्रस्ताव अमेरिकेने दिला आहे.
2 न्यूयॉर्क पोस्टनुसार इराण सरकारला चर्चेची ऑफर एक जाळं वाटतेय. चर्चेच्या नावाखाली त्यांचा एकमेव मोठा कट्टरपंथीय नेता एमबी गालिबफची हत्या होईल ही भिती आहे. कारण अमेरिकेने गालिबफलाच भेटायचं आहे असं म्हटलय. गालिबफच चर्चा फायनल करु शकतात असं अमेरिकेचं मत आहे.
हत्येची भिती असल्यामुळे इराण आपल्या बड्या नेत्यांना चर्चेसाठी कधीही पाकिस्तान पाठवणार नाही. कारण पाकिस्तानात आता चांगली स्थिती नाहीय. 2025 साली जगातील सर्वाधिक दहशतवादी हल्ले पाकिस्तानात झाले आहेत.
3 पाकिस्तान आणि इराणमध्ये कूटनितीक दृष्टीने सर्वकाही आलबेल नाहीय. पाकिस्तानने मागच्यावर्षी इराणचा कट्टर शत्रू सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला. या करारानुसार सौदी अरेबिया इराण विरोधात युद्धासाठी मैदानात उतरला, तर पाकिस्तानलाही सौदीच्या बाजूने उतरावं लागेल.
मागच्या 24 तासात पाकिस्तानचे पंतप्रधान आणि उप पंतप्रधानांनी इराणच्या वरिष्ठ नेत्यांसोबत 3 वेळा फोनवर चर्चा केली. मात्र, तरीही इराणने हॉमुर्झमधून पाकिस्तानी जहाजाला जाण्याची परवानगी दिली नाही. यूएईवरुन येणारं जहाज सेलनला इराणने परत पाठवून दिलं. पाकिस्तान आणि इराणमध्ये कूटनितीक संबंध किती खराब आहेत हे यावरुन दिसतं.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.