मध्य पूर्वेतील संघर्ष सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं चित्र होतं. दरम्यान, सोन्या चांदीचे भावही अचानक गडगडले होते. मात्र या घसरणीला आता ब्रेक लागला आहे. बुधवारी सोने आणि चांदीच्या भावात वाढ दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बाजार उघडताच चांदी प्रति किलो ११ हजार ५०० रुपयांनी तर सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ५ हजार ५०० रुपयांची वाढ झाली होती.


एमसीएक्सवर ५ मे पर्यंतच्या चांदीचा वायदा भाव ५ टक्क्यांनी वाढला. मंगळवारी चांदीचे भाव २ लाख २३ हजार ९४१ रुपये प्रति किलो इतके होते. तेच आज प्रति किलो २ लाख ३७ हजार ३५० रुपयांवर पोहोचली. यानुसार चांदी तब्बल १३ हजार ४०९ रुपयांनी महाग झालीय.

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

सोन्याचे भावही गडगडले असून २ एप्रिलपर्यंतच्या सोन्याचा वायदा भाव मंगळवारी १ लाख ४२ हजार १९५ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता. तो वाढून बुधवारी १ लाख ४८ हजार ४४२ रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याच्या भावात जवळपास ६ हजार २४७ रुपयांची वाढ झाली.सोन्याचा भाव रात्री ८ वाजण्याच्या सुमारास प्रति तोळा १ लाख ४४ हजार इतका होता. तर चांदीचा भाव प्रति किलो २ लाख ३५ हजार ५०० इतका होता.


जागतिक बाजारात उलथापालथ होते तेव्हा सर्वसामान्यपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं आणि चांदीकडे वळतात. त्यामुळे सोने-चांदीच्या भावात उसळी दिसून येते. पण अमेरिका इराण युद्धानंतर यात घसरण झाली होती. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं त्यादिवशी सोन्याचे दर १ लाख ६२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतके होते. तर चांदीचा भाव २७ फेब्रुवारीला २ लाख ८२ हजार ६४४ रुपये इतका होता.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.