पुणे शहरातील चंदननगर आणि नांदेड सिटी परिसरात संतापजनक घटना घडली आहे. तीन अल्पवयीन मुलींना धमकावत आणि त्यांना फसवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दुसऱ्या एका घटनेत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विवाहाचे आमिष आणि सोशल मीडियावर बदनामी करेल, अशी भीती दाखवून मुलींवर अत्याचार झाले आहेत.

Shocking : २ बायकांपासून १८ मुलं, तरीही माजी सरपंच तिसरीच्या प्रेमात पडला, गर्लफ्रेंडने भेटायला बोलावून केलं भयंकर कृत्य

या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अत्याचारासह बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनगर (येरवडा) येथील एका २७ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपीने एका १७ वर्षीय मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.


हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडिताच्या आईने जाब विचारला, त्यावेळी आरोपीनेपीडितेच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली अशी बाब फिर्यादीत नमूद आली आहे. सोमनाथनगर येथून एका २७ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपीने १६ वर्षीय युवतीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार समजताच नातेवाईकांनी जाब विचारला असता, तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धकमी दिली.

Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अन्य एका घटनेत नांदेड सिटी परिसरात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली होती. पीडित मुलगी देवदर्शनासाठी गेल्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.