कऱ्हाड - कऱ्हाड -चिपळुण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन महिने कऱ्हाड-चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक पाचवड फाटा, उंडाळे, कोकरुड, मलकापुर, आंबाघाट मार्गे संमगवेश्वरवरुन चिपळुणकडे वळवण्यात आली आहे. पोलिस अधिक्षकांनी त्याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत.


कऱ्हाड -चिपळुण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण शहरातील पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी ६० दिवस कालावधी लागणार असलेने तोपर्यंत नागरीकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होवु नये याकरीता सदर मार्गावरील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कऱ्हाड व उंब्रजकडुन चिपळुणकडे जाणारी अवजड वाहतुक कऱ्हाड व उंब्रज येथून सरळ पुणे-बंगळुरु महामार्गावरुन पाचवंड फाटा उंडाळे कोकरुड मलकापुर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळुन कडे जाईल.


तर चिपळूणकडून कऱ्हाड, उंब्रजकडे येणारी वाहतुक चिपळुनवरुन संगमेश्वर आंबा घाट मलकापुर कोकरुड उंडाळे पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्गावलर येईल. कऱ्हाड व उंब्रजकडुन चिपळुण कडे जाणारी सर्व हलकी वाहतुक कराड व उंब्रज येथुन नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौड येथून कऱ्हाड ते चिपळुन महार्गावरून चिपळुन कडे जातील.


चिपळुणकडुन येणारी वाहतुक नेरळे गौंड गव्हाणवाडी फाटा नवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे जाईल. वरील वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतूक मार्गांत केलेल्या बदलांबाबत सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.