Pune Crime News :  पुणे विद्यापीठातील दोन परदेशी मुलींचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ओटीपी मागण्याच्या बहाण्याने मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेला होता. प्राध्यापकांच्या निवासस्थानी असलेल्या परदेशी विद्यार्थिनींच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या जागी हा प्रकार घडला आहे.  डिलिव्हरी बॉयवर चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रोहिदास वाजे असं विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच नाव आहे. विद्यापीठातील आधीसभेत हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थिनींना तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता. 


विद्यापीठाने माहिती दडवल्याचा आरोप


पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन परदेशी विद्यार्थिनीवर एका डिलिव्हरी बॉय ने घाणेरडा प्रकार करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आहे. ओटीपी मागण्याच्या पाहण्याने डिलिव्हरी बॉय मुलींच्या तात्पुरत्या दिलेल्या निवासस्थानी पोहोचला आणि त्यानंतर त्याने विद्यार्थिनी समोरच नको ते कृत्य करायला सुरुवात केली. यानंतर विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करण्यासाठी विद्यापीठाकडे माहिती दिली. मात्र विद्यापीठाने ही माहिती दडवल्याचा आरोप केला जात आहे.



Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.