राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता
‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत
उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट संघर्ष तीव्र
'मला तुमच्यावर भरोसा आहे; पण तुम्हाला लढायचे नसेल तर तसे सांगा, मी थांबतो, भूमिका स्पष्ट करत उद्धव ठाकेरेंनी पक्ष सोडून शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांचं मत परावर्तित करत एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर उधळून लावल्याची चर्चा आहे, ठाकरे गटावरील फोडाफोडीचं संकट अजून टळलं नाहीये, त्याचे कारणं असं की, शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर होणारच असं विधान केले.
Devendra fadnavis : लॉकडाउनची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई; CM फडणवीसांचा कडक इशाराआज त्या नांदेडला आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केले. ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, जे पण होणार योग्य वेळी होणार असल्याचे विधान करत ज्योति वाघमारे यांनीउद्धव ठाकरेंची चिंता वाढवली आहे. अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपचं लोटस ऑपरेशन असो किंवा राष्ट्रवादी पक्षातील विभाजन, यावरून राज्याच लक्ष वेधल्या गेलं होतं.
Devendra Fadnavis : युद्धाच्या पार्श्वभूमीवर CM देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची बैठक; काय निर्णय घेणार?आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातमोठा भूकंप होणार असल्याचे संकेत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या तथा राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी दिले आहे. ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार, जे पण होणार योग्य वेळी होणार असल्याचे खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या. नांदेडमध्ये आयोजित महिलांच्या सत्कार कार्यक्रमासाठी ज्योती वाघमारे ह्या आज नांदेडला आल्या होत्या. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे लोकसभेतील ९ खासदारांपैकी ६ खासदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे 'ऑपरेशन' घडवलं होतं. ठाकरे गटातून येणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद देण्याचे ठरले होतं.
परंतु उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिंदे गटात जाणाऱ्या या खासदारांची बैठक केली. त्यानंतर हे 'ऑपरेशन' तूर्तास स्थगित झाले. या बैठकीत खासदारांनी आपल्या नाराजीचं कारण उद्धव ठाकरेंना सांगितलं. आम्हाला आपल्याकडून वेळ दिला जात नाही. सत्तारूढ खासदारांना सरकारकडून मतदारसंघातील कामांसाठी अतिरिक्त निधी दिला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झाल्याचं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या भूमिका मांडत खासदारांचे मन परावर्तित केलं.
फोडाफोडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची 'मातोश्री' निवासस्थानी बैठक बोलावली. या बैठकीत खासदार फुटीवर उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य केले. त्यामुळे तुर्तास टायगर ऑपरेशन टळलं. पण पुढील काही दिवसात पक्षात बंडाळी होण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी टायगर ऑपरेशन होणार असल्याचं म्हटलंय.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.