Middle East Tensions नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सहयोगी देशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानं नाराज झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प एकीकडे इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना सहयोगी देशांकडून सहकार्य मिळत नाहीये. युरोपियन देशांनी इराणविरुद्धच्या युद्धात थेट सहभागी होण्यापासून दूर राहणं पसंतकेलं आहे. याशिवाय काही देशांनी अमेरिकेला हवाई हद्द वापरण्यास नकार दिला आहे. 


फ्रान्स, इटली, स्पेन आणि स्वित्झरलँड या सारख्या देशांनी अमेरिकन लष्करी विमानांना हवाई एअरस्पेस वापरण्यास मनाई केली आहे. यामुळं अमेरिकेच्या रणनीतीवर परिणाम होत आहे. यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांची नाराजी वाढली आहे. 


डोनाल्ड ट्रम्प इतर देशांवर नाराज


डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्धच्या संघर्षात  सहयोगी देशांनी घेतलेल्या भूमिकेनं नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की पुढील काळात या देशांनी मदतीसाठी अमेरिकेवर अवलंबून राहू नये. तेव्हा अमेरिका त्यांना मदत करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की या देशांनी एटीएफ आमच्याकडून खरेदी करावं किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीत स्वत: जाऊन तेल घेऊन यावं. यूनायटेड किंग्डमनं देखील इराण विरुद्धच्या युद्धात थेट उतरण्यास नकार दिला आहे. मात्र, यूकेनं त्यांच्या क्षेत्रात अतिरिक्त सैन्य दल आणि हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.  


अमेरिका आणि त्यांचे साथीदार नाटोचे सदस्य देशांची भूमिका वेगळी दिसत आहे. अमेरिकेला यावेळी जगभरातून समर्थन मिळत नसल्याचं पाहायाल मिळतेय. यामुळं परिस्थिती बिकट होत चालली आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी इराण विरोधात सुरु असलेलं युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटीवर समाप्त होईल. इराणला अमेरिकेच्या निर्णयांचं पालन करावं लागेल. ट्रम्प म्हणाले अमेरिकेनं इराणला पूर्णपणे कमजोर केलं आहे.  ट्रम्प यांनी आवश्यकता पडल्या इराणला पूर्णपणे संपवून टाकू, असा इशारा दिला आहे. इराणकडे अणवस्त्र नसलं पाहिजे आणि होर्मुझ सामुद्रधुनी सुरु व्हावी, असं  ट्रम्प म्हणाले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.