आजपासून (एक एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या नव्या आर्थिक वर्षांत आपल्या दैनदिन जीवनातील अनके गोष्टी, नियम बदलणार आहेत, ते काय आहे जाणून घेऊया
ATM - पैसे काढणे महाग होणारनव्या आर्थिक वर्षांपासून ATM मधून पैसे काढताना काळजी घ्या, कारण आता ATM मधून पैसे काढण्यासाठी मर्यादा घातल्या आहेत.बँका आता UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची विनामूल्य मर्यादा म्हणून मोजतील. 5 ट्रान्झॅक्शननंतर प्रत्येक वेळी 23 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, बंधन बँकेत कमी बॅलेन्स राहिल्यामुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास 25 रुपये दंड आकारला जाईल.HDFC सारख्या बॅंकाना हा नियम लागू होत आहे.
पैसे काढण्याची मर्यादा कमीडेबिट कार्डसाठी दररोज पैसे काढण्याची मर्यादा पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 1 लाख रुपयांवरून 50,000 ते 75,000 रुपये केली आहे.
नवीन फॉर्म फॉर्म 130नोकरी करणाऱ्या ऑफिसकडून मिळणारा आता 'फॉर्म 16'मध्ये बदल करण्यात आला आहे. त्याऐवजी एक नवीन आणि स्मार्ट फॉर्म असणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून पगार आणि टॅक्सचा हा हिशेब पूर्णपणे बदलणार आहे. कारण आता फॉर्म 16' ऐवजी 'फॉर्म 130' असणार आहे यामुळे कर अहवाल आणखी स्पष्ट आणि पद्धतशीर होईल अशी अपेक्षा आहे.
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचं गूढ वाढलं! मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती; 'त्या' खास व्यक्ती कोण? नवीन करप्रणालीप्राप्तिकर कायदा 2025 आता 1961 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या आयकर कायद्याची जागा घेतली आहे. ‘मूल्यांकन वर्ष’ आणि ‘मागील वर्ष’ यासारखे शब्द काढून टाकले जातील आणि त्याऐवजी फक्त एक ‘कर वर्ष’ असे असेल.
पॅन कार्डसाठी कठोर नियमजर तुम्हाला पॅन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी जन्मतारखेसाठी पूर्वीसारखा पुरावे म्हणजे आधार कार्ड पुरसे ठरणार नाही.
त्यासाठी नवीन नियम कडक करण्यात आला आहे. जन्मतारखेसाठी पासपोर्ट किंवा 10 वीची गुणपत्रिका बंधनकारक असेल
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन2FA ही एक सुरक्षा प्रक्रिया आहे, डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या प्रमाणीकरण पद्धतींची आवश्यकता असते. डिजिटल पेमेंट केवळ एका OTP ने पूर्ण होणार नाही. प्रत्येक व्यवहारासाठी किमान दोन सुरक्षा स्तरांची आवश्यकता असेल.
12 लाखांपर्यंत- उत्पन्नावर कर नाहीनवीन कर प्रणालीत लागू करण्यात आली आहे. यात मोठी सवलत देण्यात आली आहे. आता जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. कलम 78A अंतर्गत सवलत वाढवल्याने मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्चेचे तिकीट रद्द करणेतुमचा प्रवास काही कारणास्तव रद्द झाला असेल आणि तुम्हाला रेल्वेचे तिकीट रद्द करणे पूर्वीप्रमाण सोपे राहिलेल नाही. त्यात बदल करण्यात आला आहे. प्रवासाच्या 8 तास आधी तिकीट रद्द केले तर परतावा मिळणार नाही. पूर्वी ही मुदत 4 तासांची होती.
नवीन रचना-रेल्वे तिकीट परत करणे
8 ते 24 तास अगोदर रद्द करणे: फक्त 50 टक्के परतावा. 24 ते 72 तास आधी: 25 टक्के कपात असेल. 72 तासांपूर्वी: जास्तीत जास्त कॅन्सलेशन शुल्क कापले जाईल.
प्रवास आणि सुविधायुद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किंमतीतील बदल होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम विमान तिकीट आणि वाहतुकीवर होईल.आजपासून (1 एप्रिल) आपण जर प्रवासाला प्लॅन करीत असाल, तर काळजीपूर्वक नियोजन करा.
इंधनाचे दरघरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत आजपासून (1 एप्रिल) बदल होण्याची शक्यता आहे. CNG, PNG आणि ATM (एव्हिएशन फ्युएल) च्या किंमती देखील बदलण्याची शक्यता आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.