बारामती: राज्य सरकारने नवीन आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) वार्षिक मूल्यदर तक्त्यांमध्ये (रेडी रेकनर) कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे १ एप्रिलपासून राज्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार मागील वर्षीच्या दरानेच होणार असून, सर्वसामान्यांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून दरवर्षी १ एप्रिल रोजी नवीन दर जाहीर केले जातात. मात्र, सध्याची जागतिक परिस्थिती आणि बांधकाम क्षेत्रातील काही अंशी असलेली मंदी विचारात घेऊन क्रेडाईसारख्या संघटनांनी दर स्थिर ठेवण्याची विनंती केली होती. या विनंतीचा सकारात्मक विचार करत सरकारने राज्यातील ग्रामीण, नागरी आणि प्रभाव क्षेत्रातील दर 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तळटीपा बदलण्याची गरज होती...
सर्वसामान्य ग्राहकाचे हित विचारात घेत जाचक अटी दूर कराव्यात ही आमची मागणी होती, यातील तळटीपा बदलण्याची मागणी होती, त्यावर विचार झालेला दिसत नाही. अजूनही राज्य शासनाने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. – प्रफुल्ल तावरे, अध्यक्ष, क्रेडाई, बारामती.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.