इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभरात औद्योगिक आणि आर्थिक पातळीवर दिसून येत आहे. रस्ते वाहतूक ते स्वयंपाक घर ते आता थेट बेडरूमपर्यंत युद्धाच्या झळा पोहोचत असल्याचं समोर आलंय. एका बाजूला होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं एलपीजी गॅस, पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे अनेक क्रिटिकल पेट्रोकेमिकल्स आणि ल्युब्रिकेंट्सच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं कंडोम इंडस्ट्रीलासुद्धा फटका बसताना दिसतोय. यामुळे भारतीय कंडोम मॅन्युफॅक्चरिंक इंडस्ट्रीला मोठं नुकसान होत आहे. हा उद्योग जवळपास ८६० मिलियन डॉलर इतका आहे. Global Conflict Hits Condom Supply Chain Industry Faces Production Slowdow
भारतात दरवर्षी ४०० कोटींपेक्षा जास्त कंडोम तयार केले जातात. पण कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे आता त्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. यामुळे सरकारी कंडोम निर्मिती कंपनी एचएलएल लाइफकेअर लिमिटेडलासुद्धा फटका बसत आहे. ही कंपनी दरवर्षी जवळपास २२१ कोटी कंडोम तयार करते. तर मॅनकाइंड फार्मा लिमिटेड, क्युपिड लिमिटेड या कंपन्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवरकंडोम निर्मितीत सिलिकॉन ऑइल आणि अमोनिया महत्त्वाचे असते. सिलिकॉन ऑइल हे एक ल्युब्रिकेंट आहे. मध्य पूर्वेत युद्धामुळे सध्या याचा तुटवडा जाणवत आहे. युद्धानंतर कंडोम उत्पादन कंपन्यांमध्ये अस्थिरता निर्माण झालीय. अमोनिया कच्च्या लेटेक्सला स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्याच्या किंमतीत आता ४० ते ५० टक्के वाढीची शक्यता आहे.
पेट्रोकेमिकल्सचा वापर करून ज्या गोष्टी तयार होता त्या सगळ्यावर युद्धजन्य स्थितीचा परिणाम होत आहे. पीव्हीसी फॉइल, एल्युमिनिअम फॉइल आणि पॅकेजिंग साहित्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्यानं उत्पादन घटले आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचं एका कंडोम निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं. कंडोम उत्पादनासाठी अमोनिया जास्त लागतं. त्याचे दर ४० ते ५० टक्के वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय सिलिकॉन ऑइलचे दरही वाढले आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.