अंबड - जालना जिल्हयातील अंबड शहरातील इंदिरानगर येथील शुभम गणेश मुर्तडकर (वय-26) वर्ष हा युवक बुधवारी (ता. 1) सकाळी तालुक्यातील शिरनेर येथे घराला रंग देण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या भिंतीला रंग देत असताना हातातील ब्रशला त्याने पाच ते सहा फूट लोखंडी पाईप लावलेला होता.
बाजुलाच असलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या ताराला ब्रशचा पाईप लागल्याने विजेचा शॉक लागला. त्याला अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक, ग्रामस्थांनी दाखल केले असता डॉ. स्वप्नील पाटील यांनी तपासून शुभम मुर्तडकर याला मयत घोषीत केले. शवविचेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सायंकाळी शुभम मुर्तडक या युवकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुंभम मुर्तडकर याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, सहा महिन्याची मुलगी, आई, वडिल, भाऊ, भावजाई असा मोठा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने अंबड शहरासह शिरनेर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.