आजकाल फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. जिममध्ये जाणे, डाएट प्लॅनचे पालन करणे आणि विशेषतः उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे हा एक ट्रेंड बनला आहे. त्यातच बहुतेकजण स्नायू तयार करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि मजबूत शरीर टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवत आहेत. कारण प्रोटीन आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे, परंतु त्याचे जास्तीचे सेवन कधीकधी हानिकारक ठरू शकते. अनेकदा असे दिसून येते की, लोक तज्ञांचा सल्ला न घेता प्रोटीन पावडर, सप्लिमेंट्स आणि उच्च-प्रथिनयुक्त आहाराचे अतिसेवन करतात. त्यामुळे अतिसेवनाचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. तर आजच्या या लेखात आपण अशा पाच लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, जी शरीरातील प्रोटीनचे प्रमाण जास्त झाल्यावर दिसून येतात.

किडनीवरील दाब आणि लघवीच्या रंगात होणारे बदल

हेल्थलाइननुसार अतिरिक्त प्रथिने घेतल्याने किडनीवर अधिक ताण येतो. त्यामुळे जर तुम्हाला किडनीच्या समस्या जाणवत असतील किंवा लघवीच्या रंगात बदल दिसून आल्याचे लक्षात येत असेल तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ सेवन करता असण्याची शक्यता आहे. अतिरिक्त प्रोटीनचे सेवनामुळे किडनीला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे लघवीला फेस येणे किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.

वारंवार तहान लागणे आणि डिहाइड्रेशन

शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रोटीनचे प्रमाण झाल्यास तुम्हाला वारंवार तहान लागू शकते आणि शरीर कोरडे पडल्यासारखे वाटू शकते. कारण अतिरिक्त प्रोटीनमुळे शरीरातील नायट्रोजन बाहेर टाकण्यासाठी शरीराला जास्त पाणी वापरावे लागते, ज्यामुळे डिहाइड्रेशन देखील होण्याची शक्यता असते.

पचनाच्या समस्या (बद्धकोष्ठता, गॅस, अतिसार)

गरजेपेक्षा जास्त प्रोटीनचे सेवन पोटावर नकारात्मक परिणामही करतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अतिसार यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या जाणवत असतील, तर हे एक लक्षण असू शकते की तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन घेत आहात.

तोंडाची दुर्गंधी

कधीकधी शरीरात प्रोटीनचे प्रमाण जास्त झाल्यास तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. जर कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तुमच्या श्वासातून दुर्गंधी येत असेल, तर ते उच्च-प्रथिनयुक्त आहाराचा परिणाम असू शकतो. हे सहसा कीटोसिसच्या स्थितीत घडते, जेव्हा शरीर कर्बोदकांऐवजी फॅट बर्न करते.

वजन वाढणे

बऱ्याच लोकांना वाटते की प्रोटीनमुळे फक्त स्नायूच तयार होतात, पण त्याचे अतिसेवन केल्यास फॅटमध्येही त्याचे रूपांतर होऊ शकते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन करूनही तुमचे वजन वाढत असेल तर ते तुमच्या शरीरातील अतिरिक्त प्रोटीनमुळे असू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब प्रोटीनचे सेवन कमी करावे आणि केवळ तज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीनचे सेवन करावे.

जास्त प्रोटीन खाण्याचे शरीराला होणारे नुकसान

आरोग्य तज्ञ सांगतात की अतिरिक्त प्रोटीन सेवनाचा आपल्या हाडांवर सर्वात प्रतिकूल परिणाम होतो. खरे तर जेव्हा शरीरात प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त होते, तेव्हा कॅल्शियम शरीराबाहेर टाकले जाऊ लागते. यामुळे हाडे कमकुवत होतात आणि सांधेदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून प्रोटीनचे सेवन नेहमी वय आणि वजनानुसार योग्य प्रमाणातच केले पाहिजे.


( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.