Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Marathi Update News: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिच क्लासन व नितीश कुमार रेड्डी यांच्या दमदार फलंदाजीनंतर SRH च्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. KKR ला सलग दुसऱ्या सामन्यात हार पत्करावी लागली. अंगकृश रघुवंशीने अर्धशतक झळकावले खरे, परंतु इतरांनी निराश केले. हैदराबादच्या गोलंदाजांनी चेंडूचा वेग कमी ठेवून अचूक मारा करून कोलकाताला हतबल केले आणि विजयासह IPL 2026 POINT TABLE मध्ये सहाव्या क्रमांकावर आगेकूच केली. कोलकाता १० व्या क्रमांकावर घसरला आहे.
SRH च्या फलंदाजांनी इडन गार्डनवर त्यांची ताकद दाखवली. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी ५.४ षटकांत ८२ धावा जोडताना KKR च्या गोलंदाजाना हतबल केले. हेड २१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्लेसिंग मुझरबानीने एकाच षटकात दोन धक्के दिले. अभिषेक २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार लगावून ४८ धावांवर, तर इशान किशन १४ धावांवर बाद झाला. यानंतर SRH ची धावगती काहीकाळासाठी मंदावली.
KKR vs SRH Live : भाई, नेमकं RUN OUT कोण झालं? अंगकृश रघुवंशीला मलिंगाकडून धक्काबुक्की; पुढच्याच चेंडूवर झाला कांड...नितीश कुमार रेड्डी ( ३९) व हेनरिच क्लासेन ( ५२) यांच्या ७० धावांनी SRH ला ८ बाद २२६ धावांपर्यंत पोहोचवले. हैदराबादने IPL 2026 मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेपार धावा केल्या. ब्लेसिंगने चार विकेट्स घेतल्या. KKR ला फिन अॅलनने ७ चेंडूंत २८ धावा चोपून दमदार सुरूवात करून दिली, परंतु अजिंक्य रहाणे ( ८) आज अपयशी ठरला. कॅमेरून ग्रीनही दोन धावेवर रन आऊट झाला.
अंगकृश रघुवंशीने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावताना उप कर्णधार रिंकू सिंगसह ४६ धावा जोडल्या होत्या. या सामन्यात २-३ वेळा रन आऊट होता होता वाचणारा रघुवंशी अखेर धावबादच झाला. त्याला २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांवर माघारी परतावे लागले. रिंकू या विकेटमुळे निराश झाला. KKR ने ११ षटकांत ४ बाद १२० धावा केलेल्या आणि त्यांना ११७ धावा आणखी करायच्या होत्या.
KKR vs SRH Live : OUT or NOT OUT? अभिषेक शर्माच्या झेलवरून वाद, SRH च्या ताफ्यात नाराजी; ब्लेसिंगने फिरवली मॅच, Videoअनुकूल रॉयला ( ०) १२ व्या षटकात नितीश रेड्डीने माघारी पाठवून KKR च्या अडचणी वाढवल्या. नितीशने आणखी एक धक्का देताना रिंकूला ( ३५) बाद केले. सुनील नरीनवर आता कोलकाताची सर्व भीस्त होती, पण तो ४ चेंडूंत १२ धावांचे योगदान देऊन बाद झाला. इशान मलिंगाने त्याची विकेट घेतली. मलिंगाच्या त्याच षटकात रमणदीप सिंग ( १०) बाद झाला आणि KKR च्या विजयाच्या आशा मावळल्या. KKR १६ षटकांत १६१ धावांवर गडगडला आणि हैदराबादने ६५ धावांनी विजय मिळवला. जयदेव उनाडकटने ३ विकेट्स घेतल्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.