राज्याच्या प्रशासनात पुन्हा फेरबदल


राज्यातील २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या


दीपक सिंगला, डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह २५ अधिकाऱ्यांची बदली


राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी १० सनदी अधिकाऱ्यांची बदली केली होती. यामध्ये सनदी अधिकारी अश्विनी भिडे आणि तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर आज गुरुवारी पुन्हा एकदा प्रशासनात फेरबदल करण्यात आले आहेत. आज २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत .


कुणाची नियुक्ती कुठे झाली?


दीपक सिंगला (IAS:RR:2012), अतिरिक्त आयुक्त, PMRDA, पुणे यांची ‘MGNREGS’, महाराष्ट्र, नागपूर येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.


के. मंजुलेक्ष्मी (IAS:RR:2013), आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांची PMRDA, पुणे येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.


डॉ. राजेंद्र भारूड (IAS:RR:2013), प्रकल्प संचालक (RUSA), उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांची आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरात नियुक्ती झालीये


डॉ. प्रवीणकुमार देवरे (IAS:SCS:2013), आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे यांची बुलढाणा येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीये


जी. श्रीकांत (IAS:RR:2009), आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर यांची ‘जल जीवन मिशन’, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झालीये


दिलीप स्वामी (IAS:SCS:2011), जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’, अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक येथे बदली करण्यात आलीये.


वर्षा ठाकूर-घुगे (IAS:SCS:2011), जिल्हाधिकारी, लातूर यांची ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’, मुंबई येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी येथे बदली करण्यात आलीये

प्रशासनात पुन्हा फेरबदल; बड्या IAS अधिकाऱ्याची अचानक बदली, कुठे होणार नियुक्ती?

डॉ. भारत बास्तेवाड (IAS:SCS:2013), आयुक्त, MGNREGS, महाराष्ट्र, नागपूर यांची लातूर, जिल्हाधिकारी म्हणून बदली


डॉ. मंगेश गोंदवले (IAS:Non-SCS:2015), व्यवस्थापकीय संचालक, MAIDC, मुंबई यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून बदली


कुमार आशीर्वाद (IAS:RR:2016), जिल्हाधिकारी, सोलापूर यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली


वसुमाना पंत (IAS:RR:2017), अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीये


प्रजित नायर (IAS:RR:2017), जिल्हाधिकारी, गोंदिया यांची अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती


वर्षा लड्डा (IAS:RR:2013), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांची आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती येथे नियुक्ती करण्यात आलीये.


अमोल येडगे (IAS:RR:2014), जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आलीये


डॉ. विजय राठोड (IAS:RR:2014), सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी येथे बदली करण्यात आलीये


विनय गौडा जी.सी. (IAS:RR:2015), जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी येथे बदली करण्यात आलीये.


डॉ. किरण पाटील (IAS:NON-SCS:2015), जिल्हाधिकारी, बुलढाणा यांची पशुसंवर्धन आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आलीये


सत्यम गांधी (IAS:RR:2021) महापालिका आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती या पदावर नियुक्ती


जास्मिन (IAS:RR:2022) सहायक जिल्हाधिकारी, राजापूर उपविभाग, रत्नागिरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर बदली


अंजली शर्मा (IAS:SCS:2022) यांची महापालिका आयुक्त, जालना महानगरपालिका, जालना म्हणून नियुक्ती


कृष्णकांत कंवारिया (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, शहादा उपविभाग, नंदुरबार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना पदावर बदली

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

अंकित (IAS:RR:2019), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांची अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर पदावर बदली


कार्तिकयेन एस. (IAS:RR:2020), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती


संजिता मोहपात्रा (IAS:RR:2020), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांची आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली पदावर बदली


मिन्नू पी एम (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर पदावर नियुक्ती

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.