असा कोणताही गुन्हा नाही जो पुण्यात होत नाही....मुळात गुन्हेगारीचे नवनवे प्रयोगच या नगरीत राबवले जातायत की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. कारण ड्रग्ज रॅकेटचा झोप उडवणारा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय...होय...अगदी डब्बा कार्टेल वेब सीरीजपेक्षा भयानक म्हणजेच चक्कं तुमच्या मोबाईलमधील पोर्टर अॅपच्या माध्यमातून कानोकान खबर न लागताच अगदी शांत आणि थंडपणे ड्रग्ज तस्करीचं रॅकेट सुरु असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय...मात्र हे रॅकेट उघड झालं ते एका अल्पवयीन मुलीमुळे....


पुण्यातील उत्तमनगर भागात एक अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार करण्यात आली.. त्याचा तपास करत असताना आरोपीचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं.. पोलिसांनी आरोपीचा माग काढला.. आणि त्याच्या मुसक्या आवळल्या... त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे दोन पुड्या सापडल्या... त्या पुड्या तपासल्या आणि ते एमडी ड्रग्ज असल्याचं समोर आलं... त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला.. त्यात पोर्टर नावाचं अॅप मिळालं.. या अॅपमध्ये 300 जणांची यादी मिळाली.. याच अॅपवरुन आरोपी एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

पकडलेल्या आरोपीला पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि आरोपी पोपटासारखा बोलायला लागला.. त्यानंतर या प्रकरणात 8 जणांचा समावेश असल्याचं उघड झालंय.. त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आलीय.. तर 4 जण फरार आहेत.. मात्र या रॅकेटची सुरुवात झाली ती तुरुंगातूनच.. तुरुंगात असतानाच आरोपीची दुसऱ्या आरोपींशी ओळख झाली.

Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; उत्तर प्रदेश कनेक्शन आलं समोर

आणि बाहेर आल्यानंतर याच आरोपींनी थेट पोर्टर अॅपवरुन ड्रग्ज तस्करी सुरु केली.. या प्रकरणाच्या तपासात आणखी बडे मासे हाताला लागण्याची शक्यता आहे... त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करुन तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱी ही विषवल्ली मुळापासून उखडून टाकणार का? हा खरा प्रश्न आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.