आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सातव्या सामन्यात 5 वेळा ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानात पंजाब किंग्स विरुद्ध 2 हात करणार आहे. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर याच्या खांद्यावर पंजाब किंग्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण दुसरा सामना असणार आहे. पंजाबने या मोसमात विजयी सलामी दिली आहे. तर चेन्नईची पराभवाने सुरुवात झालीय. या निमित्ताने उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना शुक्रवारी 3 एप्रिलला होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना यलो आर्मीच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

चेन्नई वरचढ की पंजाब किंग्स सरस?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स दोन्ही संघ आकडे पाहता तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतं. उभयसंघात शुक्रवारी होणारा 33 वा सामना असणार आहे. आतापर्यंत चेन्नईने पंजाब विरुद्ध 32 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर पंजाब किंग्सनेही तितक्याच सामन्यात चेन्नईला पराभूत केलंय.

गेल्या 5 सामन्यांमधील आकडेवारी कुणाच्या बाजूने?

दरम्यान उभयसंघात झालेल्या गेल्या 5 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये पंजाबचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. पंजाबने चेन्नईचा गेल्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर चेन्नईला फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.