कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये एका वडाच्या झाडावरून मोठा वाद सुरू आहे. दोन्ही गाावंच्या सीमेवर असेलेलं हे झाड तोडावं अशी एका गावाची मागणी आहे… पण दुसऱ्या गावातील गावकरी दीडशे वर्ष जुन्या झाडाला वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. ही गावं नेमकी कोणती आहेत? आणि हा नेमका वाद काय आहे? जाणून घेऊयात…कोल्हापूर जिल्ह्यात दोन गावांमध्ये सीमावादाऐवजी आता चक्क एका वडाच्या झाडावरून संघर्ष पेटलाय. शंभर ते दोनशे वर्षे जुने असलेले हे ऐतिहासिक वड तोडण्याच्या प्रयत्नाला मजरेवाडी ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत कारवाईला सोमवारपर्यंत स्थगिती दिलीय. शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी आणि बस्तवाड या दोन गावांदरम्यान असलेल्या तिहेरी रस्त्यावर हे वडाचं झाड आहे. बस्तवाड ग्रामस्थांचा दावा आहे की, झाडामुळे वळणावरची वाहने दिसत नसल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीने झाड तोडण्यासाठी यंत्रणा दाखल झाली होती. मात्र, मजरेवाडी ग्रामस्थांनी याला तीव्र विरोध केला. हे झाड १५० ते २०० वर्षांपासून उभं असून, गावच्या परंपरा आणि दसरा उत्सवाशी निगडित असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामपंचायतीची ना-हरकत न घेता झाड तोडण्याचा निर्णय कसा घेतला, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.