Ravi Bishnoi 4 wickets in 12 balls GT vs RR IPL 2026: राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना Point Table मध्ये सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थानी झेप घेतली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्याला रवी बिश्नोईने कलाटणी दिली, साई सुदर्शन मैदानावर असेपर्यंत GT २११ धावांचे लक्ष्य सहज पार करतील असे वाटले होते. पण, बिश्नोईने ११व्या षटकात सुदर्शनसह पुढील १२ चेंडूंत ४ विकेट्स घेतल्या आणि सामना RR च्या हातात आणून ठेवला. पण, राशीद खान व कागिसो रबाडा या जोडीने शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. तुषार देशपांडे व जोफ्रा आर्चर यांनी शेवटच्या दोन षटकांत मॅच फिरवली आणि RR चा विजय पक्का केला.
Gujarat Titans vs Rajasthan Royals Marathi Update : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी RR ला अपेक्षित सुरूवात करून दिली. या दोघांनी ६.२ षटकांत ७० धावा फलकावर चढवल्या. वैभव १८ चेंडूंत ३१ धावांवर राशीद खानच्या गोलंदाजीवर माघारी परतला. वैभवच्या विकेटनंतर यशस्वीने मोर्चा सांभाळला आणि ३६ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा कुटल्या. ध्रुव जुरेलसह त्याने ३७ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. कागिसो रबाडाने १३व्या षटकात यशस्वीचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेल्या रियान परागला ( ८) पुढच्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने बाद केले.
GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडीजुरेलने आज प्रभावी फलंदाजी केली आणि ४२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावा चोपल्या. राजस्थानने ६ बाद २१० धावा केल्या आणि अहमदाबादच्या मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या ठऱली. या सामन्यात गोलंदाज अशोक शर्माने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला. त्याने 154.2kmph च्या वेगाने चेंडू टाकला. गुजरातला कुमार कुशाग्र व बी साई सुदर्शन यांनी दमदार सुरुवात करून दिली. सुदर्शनने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या.
आठव्या षटकात रियान पराग स्वतः गोलंदाजीला आला आणि त्याने राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. कुशाग्र १८ धावांवर बाद झाला. शिमरोन हेटमायरने सीमारेषेवर झेल टिपला, पाय रेषेला टच होतोय असे वाटत असताना त्याने चेंडू पुन्हा हवेत फेकला अन् स्वतःला स्थिर करून पुन्हा टिपला. पण, सुदर्शन खणखणीत फटके चढवत होताच आणि त्याच्यामुळेच गुजरातने १० षटकांत १ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारली. ११ व्या षटकांत धावांचा हा वेग कायर राखण्याच्या प्रयत्नात सुदर्शन बाद झाला.
त्याची ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७३ धावांची ही खेळी रवी बिश्नोईने रोखली. बिश्नोईने पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्स ( ३) व वॉशिंग्टन सुंदरला ( ४) बाद करून राजस्थानच्या पुनरागमनाच्या आशा पल्लवीत केल्या. बिश्नोईने ९ चेंडूंत तीन विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. नांद्रे बर्गरने पुढील षटकात सेट फलंदाज जॉस बटलरला ( २६) बाद करून गुजरातच्या अडचणीत वाढ केली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शाहरुख खान मैदानावर आला आणि अजूनही गुजरातला ४१ चेंडूंत ७६ धावा करायच्या होत्या.
राहुल तेवाटियाने ४,६ खेचल्यानंतर बिश्नोईने तिसरा चेंडू चांगलाच फिरवला अन् राहुल ( १२) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन परतला. गुजरातचा शेवटचा स्पेशालिस्ट फलंदाज मैदानावर होता आणि त्या शाहरुख खाननेही घाई करून आपली विकेट फेकली. ११ धावांवर तो रन आऊट झाला. अजूनही ३० चेंडूंत ५० धावा गुजरातला हव्या होत्या आणि आता सर्व अपेक्षा कर्णधार राशीद खानच्या खांद्यावर होत्या. कागिसो रबाडानेही फटकेबाजी करून १८ चेंडू ३० धावा असा सामना जवळ आणला. बिश्नोईने ४-०-४१-४ अशी स्पेल संपवली.
IPL 2026 : रोहित शर्माला झटका... मुंबई इंडियन्सची हार होताच, समोर आली मोठी बातमी; समीर रिझवी ठरला कारणीभूतसंदीप शर्माने टाकलेल्या १८ व्या षटकात १५ धावा चोपून गुजरातने सामना १२ चेंडूंत १५ धावा असा जवळ आणला. जोफ्रा आर्चरने १९व्या षटकात फक्त ४ धावा देताना सामना अजूनही राजस्थानसाठी जीवंत ठेवला. ६ चेंडूंत ११ धावा हव्या असताना तुषार देशपांडे गोलंदाजीला आला. तुषारने आजच्या सामन्यात पहिल्या दोन षटकांत २० धावा दिल्या होत्या. तुषारने ४ चेंडूंत ४ धावा देताना २ चेंडू ७ धावा असा सामना चुरशीचा केला. पाचव्या चेंडूवर राशीदची ( २४) विकेट पडली अन् RR च्या ताफ्यात आनंद पाहायला मिळाला. गुजरातला ८ बाद २०४ धावाच करता आल्या आणि राजस्थानने ६ धावांनी सामना जिंकला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.