गेल्या काही दिवसांपासून एका सुंदर मुलीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही मुलगी या व्हिडीओत अभिनेता अर्शद वारसी सोबत नजरेस दिसली आहे. या मुलीचे सौदर्य पाहून युजरना ही मुलगी कोणाची असा प्रश्न पडला आहे. अनेक जण ही मुलगी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन सारखी दिसतेय असे म्हणत आहेत तर काही जणांना ती श्रद्धा कपूर सारखी वाटत आहे. तर कोण आहे ही झेने जोई पाहूयात ?
कोण आहे झेने जोई?झेने जोई ही अभिनेता अर्शद वारसी याची कन्या आहे. तिचे संपूर्ण नाव झेने जोई वारसी आहे. एका अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटच्या निमित्ताने झेने जोई स्पॉट झाली. आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. येथे ती तिचे वडील अर्शद वारसी सोबत आली होती. तिचा फोटो आणि सुंदर हास्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. युजरना तिची सिम्पलीसिटी इतकी आवडली की अनेकांनी तिला अभिनेत्री श्रद्धा कपूर हीची कॉपी म्हटले आहे. या इव्हेटमध्ये अर्शद वारसीची लाडकी कन्या ब्लॅक एण्ड व्हाईट ड्रेसमध्ये नजरेस आली होती. तिने मिनिमल मेकअप आणि मोकळे ठेवलेल्या केसांमध्ये ती सुंदर दिसत होती.
येथे पोस्ट पाहा –
लाईमलाईट पासून दूर
View this post on Instagram
A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)
झेने त्या निवडक स्टार किड्समध्ये आहे ज्या लाईमलाईटपासून दूर असतात. ती काही मोजक्या इव्हेंटमध्ये वडीलांसोबत आली होती. परंतू जास्त प्रसिद्धीत राहयला तिला आवडत नाही. इंस्टा हँडलवर झेने हिचे ११.९ हजार फॉलोअर्स आहेत. ५७ वर्षांचा अभिनेता अर्शद वारसी याने साल १९९९ मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री मारिया गोरेटी हीच्याशी लग्न केले होते. या कपल दोन मुले आहेत. मुलाचे नाव जेक आहे. तर मुलगी झेने १९ वर्षांची आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.