आयपीएलच्या स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) मंगळवारी 7 एप्रिलला मुंबई इंडियन्ससमोर राजस्थान रॉयल्सचं (RR vs MI) आव्हान असणार आहे. हा सामना गुवाहाटीतील बारसापरा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. राजस्थान घरच्या मैदानात सामना खेळणार असल्याने त्यांना आपल्या चाहत्यांचं समर्थन असणार आहे. राजस्थानने या 19 व्या पर्वात कमाल सुरुवात केली आहे. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर पलटण विजयी सुरुवातीनंतर सलग दुसरा सामना जिंकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे मुंबई राजस्थान विरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार का? याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

पलटणच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल निश्चित! कशी असेल प्लेइंग ईलेव्हन?

राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्याआधी मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या याच्या तब्येतीकडे लक्ष असणार आहे. हार्दिकला गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध अस्वस्थ वाटत असल्याने खेळता आलं नव्हतं. मात्र हार्दिक राजस्थान विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचं पलटणचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनी सांगितलं. त्यामुळे हार्दिकचं कमबॅक निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये किमान 1 बदल निश्चित समजला जात आहे. मात्र टीम मॅनेजमेंट प्लेइंग ईलेव्हनबाबत काय निर्णय घेणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.

हार्दिक पंड्यामुळे कुणाला डच्चू?

दिल्ली विरूद्धच्या सामन्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव याने मुंबईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच मुंबईने या दिल्ली विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले होते. टीम मॅनेजमेंटने हार्दिकच्या जागी ऑलराउंडर दीपक चाहर याला संधी दिली होती. त्यामुळे हार्दिकच्या कमबॅकनंतर दीपकला बाहेर व्हावं लागणार असल्याचं स्पष्ट आहे.


त्याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध ट्रेंट बोल्ट आणि अल्लाह गझनफर यांच्या जागी कॉर्बिन बॉश आणि मिचेल सँटनर यांना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंट बॉश आणि सँटनरवर विश्वास दाखवत त्यांना राजस्थान विरुद्ध संधी देणार का? हे महत्त्वाचं ठरणार आहे.


मुंबईचा राजस्थान विरुद्धच्या सामन्याआधी जोरदार सराव



pic.twitter.com/6A6VZsgF7a


— Mumbai Indians (@mipaltan)



राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जसप्रीत बुमराह.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.