Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Update : कोलकाता नाइट रायडर्सच्या वाट्याला विजयाचा गुण नाहीच... घरच्या मैदानावरील या पर्वातील दुसऱ्या सामन्यात KKR ला एका गुणावर समाधान मानावे लागले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा १२ वा सामना इडन गार्डनवर खेळवला जात होता, परंतु पंजाब किंग्सविरुद्धच्या या लढतीत पावसाचाच तांडव पाहायला मिळाला. KKR vs PBKS लढत पावसामुळे रद्द झाली आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागले. आता या एका गुणाचा नेमका कोणाला जास्त फायदा झाला? IPL 2026 Point Table मध्ये काय बदल झाला?
पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाऊस पडणार हे माहीत असूनही अजिंक्यने घेतलेला हा निर्णय सर्वांना आश्चर्यचकीत करणारा ठरला. यामुळे पुन्हा एकदा KKR च्या डावपेचांवर प्रश्न उपस्थित केले गेले. अभिषेक नायरच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली. कोलकाताचा संघ वरुण चक्रवर्थी ( दुखापत) आणि सुनील नरीनला (आजारी) या दोन प्रमुख फिरकीपटूंशिवाय मैदानावर उतरले होते.
KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातलात्यांच्याजागी KKR च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोव्हमन पॉवेल व नवदीप सैनी यांना संधी दिली गेली. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात काही खास झाली नाही. आघाडीच्या फलंदाजांचे अपयश, याही सामन्यात कायम राहिले. दुसऱ्याच षटकात फिन अॅलन ( ६) व कॅमेरून ग्रीन ( ४) यांना झेव्हियर बार्टलेटने माघारी पाठवले. ३.४ षटकांचा सामना झाला, तेव्हा पावसाने हजेरी लावली. KKR च्या तेव्हा २ बाद २५ धावा झाल्या होत्या. अजिंक्य रहाणे ( ८) व अंगकृश रघुवंशी ( ७) मैदानावर उभे होते.
१० वाजले तरी पावसाचा जोर काही केल्या कमी होताना दिसत नव्हता आणि प्रेक्षक हळुहळु इडन गार्डन स्टेडियमवर बाहेर पडताना दिसले. किमान ५-५ षटकांच्या सामन्यासाठी ११:१४ वाजता सामना सुरू होणे अपेक्षित होते. पण, परिस्थितीत सुधारणा झाली नाही आणि सामना रद्द करावा लागला. सामना रद्द झाल्यास PBKSव KKR यांना प्रत्येकी १ गुण मिळाला. त्यामुळे पंजाब ५ गुणांसह टेबल टॉपर झाले, तर कोलकाता एका गुणासह आठव्या क्रमांकावर सरकले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.