वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यातील निगडे गावाच्या हद्दीत दोन अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी केल्याची घटना रविवारी (ता.5) रोजी रात्री घडली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात सोमवार (ता.०६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 5 लाख 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल चंद्रकांत कोंढरे (वय-45, रा. आंबेगाव पठार, ता. हवेली, जि. पुणे) हे निगडे येथे सेंट्रींगचे काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रविवार रात्री सुमारे 8:50 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून दोन अज्ञात इसमांनी त्यांना भेट घेतली. यानंतर दोघांनी संगनमताने कोयत्याचा धाक दाखवत कोंढरे यांना मारहाण करत जबरी चोरी करून सोन्याचे ऐवज हिसकावून नेले.
या घटनेत आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील 10 तोळ्यांचा सोन्याचा गोफ, 6 तोळ्यांची सोन्याची चैन, सुमारे सव्वा तीन तोळ्याची अंगठी, सव्वा तोळ्याची दुसरी अंगठी, तसेच खिशातील पाकीट व रोख रक्कम जबरीने हिसकावून नेली. याशिवाय, फिर्यादींचे मित्र तानाजी श्रवण गायकवाड यांचा ओप्पो कंपनीचा मोबाईलही आरोपींनी चोरून नेला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.