IPL umpiring controversy explained SRH LSG match: सनरायझर्स हैदराबाद संघला आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पण, काही निर्णयांचा त्यांना फटका बसल्याची चर्चा आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आवेश खानने ( Avesh Khan) चेंडू सीमारेषेचा पार जाण्यापूर्वीच बाहेरून तो पुन्हा मैदानात टोलवला. अम्पायरचं लक्ष असतं आणि SRH ने आक्षेप घेतला असता तर लखनौला ५ धावांची पेनल्टी दिली गेली असती, त्यामुळे त्यांना २ चेंडंत ६ धावा कराव्या लागल्या असत्या, पण तसं काही घडलं नाही. मात्र, हैदराबाद फ्रँचायझीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Avesh Khan incident

SRHच्या तिन्ही सामन्यांमध्ये वादग्रस्त निर्णय झाले आहेत. सर्व निर्णय त्यांच्या विरोधात गेले. त्यापैकी सर्वात अलीकडील निर्णय आवेश खानने सीमारेषेबाहेर उभे राहून बॅटने चेंडू परतावल्याचा होता. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यातील शेवटून दुसऱ्या चेंडूवर रिषभ पंतने विजयी फटका मारला , पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाही. आवेशने तो चेंडू आपल्या बॅटने परत मैदानावर टोलवला. आवेशने नियम २०.१ (डेड बॉल) आणि नियम ४१ (अनफेअर प्ले) यांचे उल्लंघन केल्यामुळे एसआरएचला ५ पेनल्टी धावा दिल्या पाहिजेत, अशी चर्चा सुरू झाली.



मात्र, हे नियम लागू केले जाऊ शकत नाहीत, कारण पंतने चेंडू आधीच क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारला होता आणि आवेशने कोणत्याची क्षेत्ररक्षकाला चेंडूपर्यंत पोहोचण्यापासून रोखले नव्हते. पण, या घटनेसंदर्भात SRH भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पत्र लिहिण्याची शक्यता आहे.

IPL 2026 : आवेश खानवर बंदीची कारवाई? अतिउत्साह महागात पडणार, लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज अडचणीत सापडणार पण गोष्ट इथेच संपत नाही...

क्रिकबझच्या वृत्तानुसार SRH दोन वादग्रस्त झेलमुळे नाराज आहे, जे दोन्ही त्यांच्या विरोधात गेले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात, फिल सॉल्टचा पाय सीमारेषेला लागल्याचे काही संकेत असूनही हेनरिक क्लासनला बाद ठरवण्यात आले. पण पंचांनी त्याकडे लक्ष दिले नाही. या निर्णयामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली होती.


कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यात, वरुण चक्रवर्तीने डीप स्क्वेअर लेगला टप्पा घेऊन चेंडू टिपल्याचे दिसत होते. पण अभिषेक शर्माला बाद ठरवण्यात आले. अभिषेकने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि शिवीगाळ करत क्रीज सोडून गेला, त्यानंतर त्याला दंड ठोठावण्यात आला .

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.