New Labour Law Leave Encashment: नवीन कामगार कायद्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांमध्ये मोठा फायदा होणार आहे. तुम्ही ज्या कंपनी किंवा संस्थेमध्ये नोकरी करता तिथे कर्मचाऱ्यांना वर्षभरात किती सुट्ट्या मिळणार याची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्षात कामाचा ताण इतका असतो की अनेकांना त्या सर्व सुट्ट्या वापरता येत नाहीत. परिणामी, न वापरलेल्या सुट्ट्या वाया जातात. पण आता परिस्थिती बदलणार आहे. केंद्र सरकारने नव्या लेबर कोड अंतर्गत सुट्ट्यांच्या वार्षिक रोखीकरण सुविधा (Leave Encashment) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
पैसे मिळणारनव्या नियमांनुसार, कर्मचारी दरवर्षी त्यांच्या अतिरिक्त सुट्ट्यांचे पैसे मिळवू शकतील. यापूर्वी साधारणपणे निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडताना उरलेल्या सुट्ट्यांचे पैसे मिळत असत, मात्र आता वर्षाअखेरीसही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
New Tax Rule: 1 एप्रिलपासून नवे नियम लागू! PAN, ATM, आधार कार्ड, ITR नियमांत काय बदलणार? जाणून घ्या सोप्या भाषेत नवा नियम काय?नव्या लेबर कोडनुसार, कर्मचारी वर्षाच्या शेवटी त्यांच्या उरलेल्या सुट्ट्या कॅश करून घेऊ शकतात. ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स (OSH) कोड, 2020 अंतर्गत एका कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 30 दिवसांच्या अर्जित सुट्ट्या पुढील वर्षात नेण्याची (carry forward) परवानगी आहे.
पण, जर एखाद्या कर्मचाऱ्याकडे 30 दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या उरल्या असतील, तर अतिरिक्त दिवसांचे पैसे त्यांना दिले जातील. उदाहरणार्थ, जर वर्षाच्या शेवटी 45 सुट्ट्या शिल्लक असतील, तर त्यातील 30 दिवसांच्या सुट्ट्या पुढील वर्षासाठी ठेवता येतील आणि उरलेल्या 15 दिवसांचे वार्षिक रोखीकरण (Leave Encashment) केले जाईल.
Multibagger Stocks: 1 लाखाचे 30 लाख! Market Crash असताना या 3 शेअर्सने गुंतवणूकदारांना केल मालामाल नव्या नियमांतील महत्त्वाचे मुद्देजर कर्मचाऱ्याने सुट्टी मागितली आणि ती नाकारली गेली, तर त्या सुट्ट्या 30 दिवसांच्या मर्यादेत गणल्या जाणार नाहीत.
कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर फुल अँड फायनल सेटलमेंट 48 तासांच्या आत पूर्ण करणे कंपनीसाठी बंधनकारक असेल.
यापूर्वी अर्जित सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी 240 दिवस काम करणे आवश्यक होते, पण आता हा कालावधी कमी करून 180 दिवस करण्यात आला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.