मार्केट यार्ड - जागतिक तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती असूनही भारतीय बासमती तांदळाला जगभरातून मोठी मागणी आहे. यंदा ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज असून, इराणने चक्क स्वतःची जहाजे पाठवून भारतातून तांदूळ नेण्यास सुरुवात केली आहे.


पश्चिम आशियातील युद्धामुळे सुरुवातीला पेमेंट आणि वाहतुकीच्या अडचणी आल्या होत्या. विमा प्रीमियम आणि वाहतूक खर्च वाढल्याने निर्यातदारांसमोर आव्हाने होती. मात्र, यावर मात करत निर्यातीने पुन्हा वेग घेतला आहे. २०२३-२४ मधील ५० लाख टन आणि २०२४-२५ मधील ६० लाख टनांच्या तुलनेत यंदा ६५ लाख टनांपर्यंत निर्यात पोहोचण्याची शक्यता आहे.


यंदा पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उत्पादन ८ टक्क्यांनी घटले आहे. मात्र, इंधन टंचाईमुळे जगभरात तांदळाचा खप वाढला आहे. युद्धामुळे सुरुवातीला घसरलेले दर आता पुन्हा वधारले असून, आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी रोशन बाठिया यांनी वर्तविली आहे.


भारतीय बासमतीचा जागतिक दबदबा : वाढती मागणी आणि बाजारभाव


जागतिक निर्यात आणि मागणीचे चित्र


६५ लाख निर्यातीचा अंदाज


चालू वर्षात भारतीय बासमती तांदळाची एकूण निर्यात विक्रमी ६५ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.


जागतिक तणावाचा परिणाम शून्य


जगात युद्धजन्य परिस्थिती असूनही भारतीय बासमतीच्या सुगंधाची आणि चवीची मागणी कायम आहे.


इराणकडून विशेष प्राधान्य


तांदळाची टंचाई किवा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून इराणने स्वतःची जहाजे पाठवून भारतातून तांदूळ नेण्यास सुरुवात केली आहे.


बासमती तांदळाचे बाजारभाव (प्रति क्विंटल)


पारंपरिक बासमती - १२,००० ते १४,०००


११२१ बासमती स्टीम - ११,००० ते १२,०००


१५०९ बासमती स्टीम - १०,००० ते ११,०००


१४०१ बासमती स्टीम - ११,५०० ते १२,५००


सेला बासमती - ९,५०० ते १०,०००

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.