Assembly Election: देशात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यांपैकी आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीत गुरुवारी (९ एप्रिलला) एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. तर उर्वरित पश्चिम बंगाल, तामिळनाडूत दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. आज मतदान झालेल्या आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीत गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं आहे. त्यामुळं आता आसाम आणि पुदुच्चेरीत एनडीएची अग्निपरीक्षा असणार आहे तर केरळमध्ये माकपाच्या नेतृत्वाखालील युडीएफ आपलं वर्चस्व राखतंय का? हे पाहावं लागणार आहे.

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नवे ऑनलाईन पोर्टल सुरू; आता अर्ज केवळ ऑनलाईनच स्विकारणार

केरळ विधानसभेसाठी १४० जागांसाठी ८८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या उमेदवारांचं भविष्य राज्यातील २.७१ कोटी जनतेनं ईव्हीएममध्ये कैद केलं आहे. केरळमध्ये गेल्यावेळेपेक्षा थोडं जास्त मतदान झालं आहे. त्यानुसार, २०२१मध्ये राज्यात ७५.७५ टक्के मतदान झालं होतं. ते यंदा ७८.०३ टक्के झालं आहे. म्हणजेच जवळपास ४ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे.

आसाममध्ये २०२१ चा रेकॉर्ड तोडला

आसाम विधानसभा निवडणुकीत १२६ जगांसाठी मतदान आज पार पडलं, यामध्ये एकूण ७२२ उमेदवार रिंगणात होते. २०२१ मध्ये आसाममध्ये ८२.०२ टक्के मतदान झालं होतं. पण आता नव्यानं झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना आणि एसआयआर प्रक्रियेनंतर झालेल्या निवडणुकीत नवं रेकॉर्ड प्रस्थापित झालं आहे. यंदा आसाममध्ये ८५.३८ टक्के मतदान झालं आहे. म्हणजेच ३ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.

Assembly Election: उपमुख्यमंत्रीपदासाठी तब्बल १,००० कोटींची ऑफर! भाजप कनेक्शन आलं समोर पुदुच्चेरीत 89.83 टक्के मतदान

३० जागा असलेल्या पुदुच्चेरीत २९४ उमेदवार रिंगणात होते. पुदुच्चेरीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे. इथं ४.०६ लाख पुरुष मतदार त ५.०३ लाख महिला मतदारांची संख्या आहे. २०२१ मध्ये या केंद्रशासित प्रदेशात ८३.२८ टक्के मतदान झालं होतं. तर यंदा ८९.८३ टक्के मतदान झालं आहे. म्हणजेच जवळपास ७ टक्क्यांनी मतदान वाढलं आहे.


दरम्यान, मतदानाचा टक्का वाढणं हे सत्ताधारी पक्षाला धोक्याची घंटा मानली जाते. कारण लोक जास्त प्रमाणात घरातून बाहेर पडून मतदान करतात कारण विद्यमान सरकारविरोधात एक प्रकारची अँटी इन्कमबँसी तयार झालेली असते, म्हणजेच लोक या शासनाला वैतागलेले असतात. त्यामुळं आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीत जे सत्ताधारी आहेत त्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे. पण प्रत्यक्षात निकालाच्या दिवशीच कोण सत्ता राखेल कोण गमावेल? हे स्पष्ट होईल.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.