Bhiwandi News : भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील पुंडास-खांडपे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवर ( Mumbai-Vadodara Expressway)  चारचाकी आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पारिवली गावातील शरद पाटील (वय अंदाजे 52 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात


प्राथमिक माहितीनुसार, अकलोली-वज्रेश्वरीकडून मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. यावेळी दुचाकीस्वार शरद पाटील हे वडपा दिशेकडून कामावरून घरी परतत होते. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेचे काम सुरू असताना उद्घाटनापूर्वीच झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.


 घणसोली येथे बेस्ट बस आणि स्कूल बसमध्ये अपघात, सुदैवाने अनर्थ टळला 


घणसोली येथे बेस्ट बस आणि स्कूल बस मध्ये अपघात झाला होता. अपघात झाला तेंव्हा स्कूल मध्ये 15 विद्यार्थी होते. तर बस मध्ये सुध्दा प्रवासी होते. मात्र अपघात भीषण नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांचे पार्किंग असल्याने रस्ता अरूंद होता. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेका समोरून जाताना घासल्या गेल्या. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.


मुंबईत देखील आज अचानक AC लोकल बंद पडल्याची घटना, प्रवाशांचे झाले हाल


मुंबईत देखील आज अचानक AC लोकल बंद पडल्याची घटना घडली आहे. यामुळं प्रवाशांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वे च्या AC लोकल मध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण ला जाणारी AC लोकल करीरोड येथे मागील अर्धा तास पेक्षा जास्त वेळ थांबून होती.  कुठलीही घोषणा झालेली नाही, त्यामुळं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकल मधील वीज पुरवठा देखील बंद चालू केला जात असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व मार्गवारील लोकल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. दरम्यान, 9 वाजून 16 मिनीटांची  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून वरुन निघालेली लोकल आधीच उशिरा होती. त्यात आता अर्धा तास पेक्षा जास्त वेळ थांबून असल्यानं प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.