• आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत नवी अपडेट


  • जनाई भोसले यांनी दिली माहिती


  • प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती



संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत त्यांची नात जनाई भोसले यांनी एका पोस्टद्वारे नवी अपडेट दिली आहे.


प्रसिद्ध गायिकाआशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी नुकतीच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. यासह तिने प्रायव्हसी द्यावी अशीही विनंती केली आहे. तसेच त्यांनी आशा भोसले यांच्यासोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे.

Jana Nayagan Leak: थलापती विजयला आणखी एक मोठा झटका; प्रदर्शनापूर्वीच 'जन नायकन' ऑनलाईन लीक पोस्टमध्ये काय लिहिले आहे?

पोस्टमध्ये जनाईने लिहिले की, "माझी आजी, आशा भोसले खूप अशक्तपणा आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयातदाखल आहेत. आम्ही विनंती करतो की तुम्ही त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आशा आहे की सर्व काही ठीक होईल. आम्ही तुम्हाला लवकरच माहिती देऊ."





View this post on Instagram

A post shared by Zanai Bhosle (@zanaibhosle)