पुणे - खासगी शिकवणीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने १२ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ऑफिस बॉयवर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली आहे.
विकास दिलीप गायकवाड (वय ३५, मूळ रा. हराळवाडी, सोलापूर) असे आरोपी ऑफिस बॉयचे नाव आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा इयत्ता आठवीत शिकत असून तो खासगी शिकवणीसाठी मार्केटयार्ड भागातील एका क्लासमध्ये जात होता.
गेल्या चार- पाच दिवसापुर्वी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास जेवण झाल्यानंतर तो वडिलांना म्हणाला मी उद्या शाळेत जाणार नाही. वडील त्याला म्हणाले तु अनेकदा सुट्टी मारतो. तुला शाळेत जायला हवे. त्यावेळी मुलगा रडायला लागला. वडीलांनी विश्र्वासात घेऊन त्याला विचारले असता, त्याने विकासच्या कृत्याची माहिती दिली.
गेल्या वर्षापासून प्रकार सुरू -
विकास हा डिसेंबर २०२५ पासून मुलावर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने मुलाचे फोटो काढून त्याला मानसिक त्रास दिला. त्यानंतर वडिलांनी क्लासमध्ये जाऊन महिती घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.