Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Updates : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६च्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पकड घेतली आहे. लोकेश राहुल व पथूम निसंका यांच्या दमदार सुरुवातीनंतर CSK ने सामन्यात चांगले पुनरागमन केले आणि DC च्या ४ फलंदाजांना १५ धावांत माघारी पाठवले. या सामन्यात सर्फराज खान ( Sarfaraz Khan Stunning Catch) याने घेतलेला अफलातून कॅच चर्चेत राहिला. गुरजपनीत सिंगच्या पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने हा झेल घेतला.


आयपीएल २०२६ मधील पहिल्या शतकाचा मान संजू सॅमसनने पटकावला... २०१७, २०१९, २०२१ व २०२६ या पर्वात पहिला शतकवीर संजूच ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून शतक झळकावणारा तो पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. महेंद्रसिंग धोनीची ८४ धावांची खेळी ही आतापर्यंत सर्वोत्तम होती. संजूने पहिल्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडसह ( १५) ६२ धावा जोडल्यानंतर आयुष म्हात्रेसोबत ११३ धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रे ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांवर रिटायर्ड आऊट झाला.

Sanju Samson : सर, तुम्ही माझ्यासाठी लकी आहात, प्लीज प्रत्येक मॅचला या...! विक्रमी शतकानंतर संजूने कोणाला केली विनंती? भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव...

शिवम दुबेने १० चेंडूंत २० धावा करताना संघाला दोनशेपार पोहोचवले, तर संजू ५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह ११५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने २ बाद २१२ धावांचा पल्ला गाठून दिल्लीसमोर तगडे लक्ष्य ठेवले. चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलमधील संजूची खेळी ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. मुरली विजय ( १२७ धावा वि. राजस्थान, २०१०), शेन वॉटसन ( नाबाद ११७ वि. हैदराबाद, २०१८) आणि माइक हस्सी ( नाबाद ११६ वि. पंजाब, २००८) हे संजूच्या पुढे आहेत.



लक्ष्याचा पाठलाग करताना पथूम निसंका व लोकेश राहुल यांनी DC ला अपेक्षित सुरूवात करून देताना ५ षटकांत ६१ धावा फलकावर चढवल्या. पण, खलील अहमदने ही भागीदारी तोडली आणि KL Rahul १८ धावांवर ( १० चेंडू) झेलबाद झाला. त्यानंतर अंशूल कंबोजने पुढच्या चेंडूवर निसंकाला माघारी पाठवले. त्याने २४ चेंडूंत ४१ धावांची खेळी केली. CSK कडून पदार्पण करणाऱ्या गुरजपनीत सिंगने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि आयपीएल पदार्पणात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो १८ वा गोलंदाज ठरला.

CSK vs DC Live : १९ चेंडूंत ८४ धावा अन् शतक... संजू सॅमसनची ऐतिहासिक कामगिरी; MS Dhoni चा विक्रम मोडला, ९ मोठे पराक्रम

Wicket on the first ball on IPL debut - इशांत शर्मा ( २००८), विल्किन मोटा ( २००८), एस विद्युत ( २००८), रवी तेजा ( २००८), शेन हार्वुड ( २००९), अमित सिंग ( २००९), चार्ल लँगवेल्ड ( २००९), केविन पीटरसन ( २००९), अली मुर्तजा ( २०१०), टीपी सुधिंद्र ( २०१०), ॲडम गिलख्रिस्ट ( २०१०), हनुमा विहारी ( २०१३), अल्झारी जोसेफ ( २०१९), डेवाल्ड ब्रेविस ( २०२२), मथीशा पाथिराना ( २०२२), अश्वनी कुमार ( २०२५) आणि गुरजपनीत सिंग ( २०२६).



सातव्या षटकात ऋतुराजने पदार्पणवीर गुरजपनीत सिंगला गोलंदाजीला आणले आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने कट शॉट मारला. पण, सर्फराजने बॅकवर्ड पॉइंटवर हवेत झेपावत अविश्वसनीय कॅच घेतला. अक्षर १ धावेवर माघारी परतला आणि आयपीएलच्या या पर्वातील हा सर्वोत्तम झेल ठरला आहे.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.