मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आयपीएल २०२६ स्पर्धेतील रोमांचक सामना वानखेडे स्टेडियमवर रविवारी (१२ एप्रिल) होत आहे. मात्र या सामन्यात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
या सामन्यात बंगळुरूने मुंबईसमोर २४१ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा विक्रम केला होता. मात्र त्याला फलंदाजी करतावा अर्ध्यातूनच मैदान सोडावं लागलं.
IPL 2026: CSK च्या पहिल्या विजयानंतरही ऋतुराज गायकवाडवर BCCI कडून कारवाई; पण चूक नेमकी काय झाली?या सामन्यात बंगळुरूने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून (Mumbai Indians) सलामीला रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन उतरले होते. रिकल्टनने आक्रमक सुरुवात केली होती. रोहितही त्याला चांगली साथ दिली होती. दोघांनी मिळून ५ षटकातच संघाला ५६ धावांपर्यंत पोहचवलं होतं.
यादरम्यान, रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ६००० धावा पूर्ण केल्या. तो एकाच संघासाठी सर्वाधिक धावा (Most IPL Runs for a Team) करणारा दुसरा खेळाडू आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहली असून त्याने ८८४० धावा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी केल्या आहेत. या यादीत विराट आणि रोहितच्या पाठोपाठ एमएस धोनी असून त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी ४८६५ धावा केल्या आहेत.
दरम्यान, रोहितने हा विक्रम केला. मात्र ६ वे षटक सुरू होण्यापूर्वीच रोहितला हॅमस्ट्रिंगचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे फिजिओ मैदानात आले. त्यांनी रोहितवर तात्पुरते उपचार केले. त्यानंतर रोहितने ६ व्या षटकातील दुसरा चेंडूही खेळला.
मात्र त्यानंतर त्याने त्रास होत असल्याने रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) होण्याचा निर्णय घेतला. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह १९ धावांवर त्यावेळी होता. त्याला त्रास होत असल्याने तो मैदानातून बाहेर जात असल्याचे मुंबई इंडियन्सने ट्वीट करत सांगितले.
रोहित बाहेर गेल्याने सूर्यकुमार यादव मैदानात आला. मात्र रोहित बाहेर गेल्यानंतर ८ व्या षटकात मुंबईला सुयश शर्माने दुहेरी धक्के दिले. त्याने रायन रिकल्टनला आणि तिलक वर्माला बाद केले. रिकल्टनने २२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावा केल्या. तिलक १ धावेवरच माघारी परतला.
IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्कातत्पुर्वी, बंगळुरूसाठी फिलिप सॉल्टने ३६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली, तर कर्णधार रजत पाटिदारने २९ चेंडूत ५३ धावांची, तर विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. टीम डेव्हिडने १६ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरूने २० षटकात ४ बाद २४० धावा केल्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.