कायगाव : नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे पाटील (वय ९९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी (ता १२) सकाळी सुमारे ६.१५ वाजता देवगड येथे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.


सरुबाई यांच्या निधनाची वार्ता समजताच सकाळपासूनच श्री क्षेत्र देवगड येथे अंत्यदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत-महंत, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो भाविक अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. पुरुष, महिला आणि युवक भाविकांनी मोठ्या श्रद्धेने त्यांना अखेरचा निरोप दिला.


सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंदिर प्रांगणातून टाळ-मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. विविध गावांतील भजनी मंडळे, संत-महंत व मान्यवर या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. प्रवरा नदीकाठी असलेल्या अन्नपूर्णा प्रसादालयाच्या प्रांगणात ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात अंत्यसंस्कार पार पडले. महंत भास्करगिरी महाराजांचे ज्येष्ठ बंधू मधुकर बाबा पेसोडे पाटील यांनी सरुबाई यांच्या पार्थिवावर अग्नी दिला.


दुपारी माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.


यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष देविदास महाराज म्हस्के, उद्धवजी महाराज मंडलिक, हभप सारंगधरजी महाराज, गोविंद महाराज जाटदेवळेकर, भागवताचार्य समाधान महाराज शर्मा, आळंदी येथील बाजीराव महाराज चंदेले (नाना), कैलासगिरी महाराज, सौ. शालिनीताई विखे पाटील, विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगळ, केशव महाराज उखळीकर, डॉ. नारायण महाराज जाधव, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील आदींनी श्रद्धांजली वाहिली.


वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंदांनी केलेल्या पुजाविधी मध्ये महंत श्री भास्करगिरी बाबा,उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज  सहभागी झाले होते


तसेच महंत कैलासगिरी महाराज, उद्धवजी महाराज मंडलिक, देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री, सुनिलगिरी महाराज, नारायणानंदगिरी महाराज, चंदेले नाना, रामगिरी महाराज, साध्वी अक्का महाराज, सुवर्णानंदगिरी चैतन्य, ऋषीनाथजी महाराज, भगवान महाराज जंगले शास्त्री, हरीशरणागरीजी महाराज, नंदकिशोर खरात महाराज, राम महाराज झिंजुरके, बाळकृष्ण महाराज दिघे, गहीनीनाथ महाराज, योगीराज दादा महाराज वायसळ, संतोष महाराज चौधरी, हरी महाराज वाकचौरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, सौ. राजश्रीताई घुले, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, , डॉ. जनार्धन महाराज मेटे, , नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले ,डॉ. अविनाश काळे,प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार, पांडुरंग अभंग, बजरंग विधाते, पोलीस

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.