आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यावर, शत्रूवर मात करून प्रत्येकाचीच वरचढ ठरण्यासाठी धावपळ सुरू असते. परंतु या शर्यतीत प्रत्येकालाच यश येते असे नाही. याच शर्यतीत चाणक्य नीतीच्या सूत्रांचा वापर केला तर मात्र तुम्ही यशाला गवसणी घालू शकता.
तुमचा शत्रू तुमच्यावर मात करताना नेमके कोणते डावपेच आखतो आहे, याचा शूक्ष्म निरीक्षण करावे. कारण यामुळे शत्रूची पुढची चाल तुमच्या लक्षात येऊ शकते. तुम्ही वेळीच सावध राहू शकता. तसेच शत्रूशी दोन हात करताना तुमची शक्ती खर्च करू नका. प्रत्युत्तर देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहा.
शत्रूसोबतची लढाई ही नेहमी बळानेच जिंकता येते असे नाही. तुम्ही बुद्धीनेही अशा लढाया जिंकू शकता. त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य वेळेची वाट पाहा. भावनांवर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला डावपेच आखायला उसंत मिळेल, असे चाणक्य नीती सांगते.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.