आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) रविवारी 12 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार रंगला. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर दिवसातील दुसऱ्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने होम टीम मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. आरसीबीने मुंबईल 18 धावांनी पराभूत केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 222 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीचा हा 4 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा सलग आणि तिसरा पराभव ठरला.
मुंबईने टॉस गमावून आरसीबीला बॅटिंगसाठी बोलावलं. आरसीबीने या संधीचा जबरदस्त फायदा उचलला आणि वानखेडे स्टेडियममध्ये आपला सर्वोच्च रन्सचा रेकॉर्ड केला. आरसीबीने 12 च्या रनरेटने धावा केल्या. आरसीबीसाठी पहिल्या तिघांनी अर्धशतकी खेळी केली. तर दोघांनी दुहेरी आकडा गाठला. ओपनर फिलिप सॉल्ट याने सर्वाधिक 78 रन्स केल्या. विराट कोहली याने 38 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.
कॅप्टन रजत पाटीदार याने 20 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 53 धावांची वादळी खेळी साकारली. टीम डेव्हीड याने फिनिशिंग टच दिला. टीमने 16 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्स लगावले. टीमने नाबाद 34 रन्स केल्या. जितेश शर्मा याने 10 धावा केल्या. तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पंड्या, मिचेल सँटनर आणि शार्दूल ठाकुर या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.