पुणे : लोकसेवा ई-स्कूलचा दहावीचा शैक्षणिक वर्ष 2025–26 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल लागला आहे. निकालाची ही उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. प्रथम आलेल्या नीरजा बिहानी ला 99.4 टक्के, द्वितीय आलेल्या श्रेया मानकर ला 99.2 टक्के तर, नीलाद्री भट्टाचार्य ला 98.6 टक्के गुण मिळाले आहेत.
शाळेच्या 151 विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तब्बल 14 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तसेच, 48 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक तर, 89 विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्ये उत्कृष्ट कामगिरीची परंपरा लोकसेवा ई स्कूलने कायम राखली आहे. त्यासाठी संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वांचेच योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील, प्राचार्य शॉफीमोन पीएच यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
लोकसेवा ई-स्कूल भविष्यातही अशाच पद्धतीने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी संस्था कटिबद्ध असणार आहे असे प्राचार्य पी शाफी मोन यांनी सांगितले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 चा निकाल 93.70 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल 93.66 टक्के होता, त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे. बोर्डानं यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी विक्रमी वेळेत पूर्ण करत निकाल दरवर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर जाहीर केला आहे.
दरवर्षीप्रमाणं यंदा देखील सीबीएसईच्या दहावीच्या निकालात मुलींनी मुलांना मागं टाकत बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी अधिक आहे. सीबीएसईनं अधिकृतपणे टॉपर यादी जाहीर केली नाही. मात्र, गुणवत्ता प्रमाणापत्र त्या त्या विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. सीबीएसईनं दहावीचा निकाल जाहीर केल्यानं जवळपास 24 लाख 75 हजार विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.
सीबीएसईनं दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला असला तरीज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत अपयश आलं आहे. ते दुसऱ्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करु शकतात. याशिवाय जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत मिळालेल्या गुणांमुळं समाधानी नाहीत ते 15 मेपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. सीबीएसईकडून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज मागवले जाणार आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सीबीएसईनं दोन बोर्ड परीक्षा पद्धत आणली आहे.
सीबीएसईच्या विभागनिहाय निकालात त्रिवेंद्रम आणि विजयवाडा विभागानं बाजी मारली आहे. दोन्ही विभागांचा निकाल 99.79 टक्के लागला आहे. तर, नोएडा विभागाचा निकाल 87.66 टक्के तर दिल्ली विभागाचा निकाल 97.38 टक्के लागला आहे. केंद्रीय विद्यालयांचा निकाल 99.57 टक्के लागला असून जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल 99.42 टक्के निकाल लागला आहे. तर, सरकारी शाळांची टक्केवारी 91.43 टक्के आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.