आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यात डावलल्यानंतर मुंबई इंडियन्सने पाचव्या सामन्यात क्विंटन डीकॉकला संधी दिली. त्याने या संधीचं सोनं केलं आणि पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 60 चेंडूत 112 धावा केल्या. यात 7 षटकार आणि 8 चौकार मारले. (Photo: PTI)
रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी क्विंटन डीकॉकला संधी मिळाली. क्विंटन डीकॉकने या शतकी खेळीत काही विक्रम आपल्या नावावर केले. त्याने रोहित शर्माला मागे टाकलं. टी20 क्रिकेटमध्ये 12385 धावा करत रोहित शर्माला मागे टाकलं. (Photo: PTI)
डीकॉक आयपीएलमध्ये 3000 धावा करणारा पहिला विदेशी विकेटकीपर ठरला आहे. डीकॉकने आयपीएलमध्ये 3064 धावा केल्या आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने 5321 धावा केल्या आहेत. (Photo: PTI)
क्विंटन डिकॉकने तीन आयपीएल संघासाठी शतक ठोकलं आहे. अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्ससाठी शतक ठोकलं आहे. केएल राहुल आणि संजू सॅमसनने अशी कामगिरी केली आहे. (Photo: PTI)
क्विंटन डीकॉकने आयपीएलमध्ये तीन शतकं ठोकली आहेत. यासह त्याने एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 7 शतकं ठोकण्याचा विक्रम जोस बटलरच्या नावावर आहे. तर गेलने 6 शतकं ठोकली आहे. तर डेविड वॉर्नर आणि वॉटसनने प्रत्येकी 4 शतक ठोकली आहेत. (Photo: PTI)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.