दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज क्विंटन डी कॉक याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात खेळण्यासाठी बरेच दिवस प्रतिक्षा करावी लागली. मुंबई इंडियन्सने क्विंटनला डी कॉकला आपल्या मोहिमेतील पाचव्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली. मुंबईचा ओपनर रोहित शर्मा याला आरसीबी विरुद्ध झालेल्या दुखापतीमुळे पंजाब विरूद्धच्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे क्विंटनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली. क्विंटनने या संधीचा फायदा घेतला. क्विटंनने या मोसमातील आपल्य्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. क्विंटनने मुंबई अडचणीत असताना डाव सावरला. क्विटंनने नमन धीर याच्यासह फटकेबाजी करत मुंबईचा डाव सावरला. तसेच क्विटंनने शतक झळकावलं. क्विटंनने यासह महारेकॉर्ड केला.
अर्शदीप सिंह याने मुंबईला तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर 2 झटके दिले. त्यामुळे मुंबईची 2 आऊट 12 अशी स्थिती झाली. त्यानंतर क्विंटन आणि नमन या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. क्विंटनने यासह शतक झळकावलं. क्विंटनने अवघ्या 53 बॉलमध्ये 190.57 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. क्विटंनने या खेळीत 7 षटकार आणि तितकेच चौकार लगावले.
क्विंटनचं ऐतिहासिक शतक, वानखेडेत महारेकॉर्डक्विंटनने या शतकासह महारेकॉर्ड केला. क्विंटन 19 व्या मोसमात शतक करणारा मुंबईचा पहिला आणि संजू सॅमसन याच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला. तसेच क्विंटन आयपीएल स्पर्धेत 3 वेगवेगळ्या संघांसाठी शतक करणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला. क्विंटनने पंजाबआधी दिल्ली डेअरडेविसल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 100 धावा केल्या होत्या. तसेच क्विंटनचं हे टी 20 कारकीर्दीतील नववं शतक ठरलं.
क्विंटनने यासह रायली रुसो, विराट कोहली आणि साहिबजादा फरहान यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
क्विंटन डी कॉक याने पंजाब विरुद्ध षटकाराने आपल्या धावांचं खातं उघडलं. मात्र मुंबईचे पहिले 2 फलंदाज स्वस्तात आऊट झाले. अर्शदीपने मुंबईच्या रायन रिकेल्टन (2) आणि सूर्यकुमार यादव (0) या दोघांना आऊट केलं.
लाईव्ह स्कोअरकार्ड
क्विंटनने त्यानंतर मैदानात आलेल्या नमन धीर याच्यासह कमाल केली. क्विंटन आणि नमन या दोघांनी शतकी भागीदारी केली. नमन आणि क्विंटन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 68 बॉलमध्ये 122 रन्सची पार्टनरशीप केली. नमनने मुंबईसाठी अर्धशतक झळकावलं. नमनने 31 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.