Jayakumar Gore सोलापूर : कोणतेही ऑपरेशन ही त्याची आवश्यकता असते त्याचवेळी करायचे असते. त्यामुळे मला नक्की माहित आहे कोणते ऑपरेशन केव्हा करायचे. त्यामुळे चिंता करू नका, योग्य वेळी योग्य सर्जरी होईल आणि त्याचे परिणामही दिसतील, असा टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी लगावला. सध्या सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात ऑपरेशन टायगर जोरात सुरू असून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके अनिल सावंत अशा नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भगीरथ भालके यांनी लक्षही केले होते. त्यावरून बोलताना ऑपरेशन लोटस बंद झाले आहे का? असा प्रश्न विचारतात गोरे यांनी थेट उत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे. (Jayakumar Gore reaction on Operation Tiger)
Jayakumar Gore: आपली आयडालॉजी घुसडू नये आणि सांप्रदायाला बदनाम करू नये
वारकरी सांप्रदाय आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात सुरू असलेल्या वादात आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उडी घेतली असून वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असे खडे गाण्याचे बोल सुनावले आहे. खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी शक्ती घुसल्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सांप्रदायातील बंडातात्या कराडकर यांच्यासह अनेक दिग्विज्यांची नावे सोशल माध्यमातून दिली होती. त्यानंतर वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आणि पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत लवांडेला तात्काळ अटक करण्याची मागणी सांप्रदायाकडून करण्यात आली होती. लवांडे यांच्यावर शासनाने कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी सांप्रदायाने दिला आहे.
Jayakumar Gore on Vikas Lawande वारकरी व्यवस्थेत आपली आयडॉलॉजी घुसवण्याचा प्रयत्न करून डाग लावू नये
आता या वादात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उडी घेतली असून वारकरी संप्रदाय हा आपला अभिमान आहे. कोणीही यात राजकारण आणून सांप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला आहे. वारकरी संप्रदायाची स्वतंत्र व्यवस्था असून या व्यवस्थेत आपली आयडॉलॉजी घुसवण्याचा प्रयत्न करून डाग लावू नये, असेही गोरे यांनी सुनावल आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदाय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वाद आता वाढत जाणार, हे दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.