मराठी Shivena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा व्हायरस पसरल्याची माहिती समोर आली आहे. युवासेनेच्या शनिवारी मुंबईत पार पडलेल्या महायुवोत्सव या कार्यक्रमावेळी हे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. युवासेनेत (Yuvasena) सध्या प्रचंड अंतर्गत धुसफूस असून याच शह-काटशहाच्या राजकारणातून युवासेनेचे सरटिचणीस आणि पक्षाचे अनुभवी नेते अमेय घोले (Amey Ghole) यांना काल कार्यक्रमावेळी डावलण्यात आले. त्यांना कार्यक्रमाच्यावेळी स्टेजवर बोलावण्यात आले नाही. या गोष्टीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मुंबईच्या वरळी येथे शनिवारी ‘महायुवोत्स’व हा युवासेनेचा राज्यव्यापी मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातून युवासेनेचे पदाधिकारी मुंबईत आले होते. (Maharashtra Politics news)


या कार्यक्रमात अंतर्गत नाराजीतून रंगलेले नाट्य सर्वांना पाहायला मिळाले. या कार्यक्रमात युवासेनेच्या सर्व सचिवांना मंचावर बोलावण्यात आले होते. मात्र, युवासेनेचे सरचिटणीस आणि शिवसेनेचे पालिकेतील गटनेते नगरसेवक अमेय घोले हे कार्यक्रमस्थळी असूनही मंचावर पहायला मिळाले नाहीत. युवासेनेतील अंतर्गत वादातून अमेय घोले यांना डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ युवासेनेतही मतभेद असल्याचे दिसून आले.  मात्र, या अंतर्गत नाराजीनाट्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.


यावर एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्याकडून जाहीरपणे कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच सोलापूर आणि धाराशिवमधील शिवसैनिकांमध्ये आमदारांविरोधात असंतोष दिसून आला होता. याशिवाय, शिवसेनेचे अनेक आमदार काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत नाखूश आहेत. त्यांनी ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्याठिकाणी एकनाथ शिंदे नव्या चेहऱ्यांची निवड करतील, अशी चर्चा आहे.


Who is Amey Ghole: कोण आहेत अमेय घोले?


अमेय घोले हे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत.  अमेय घोले यांना मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाचा चांगला अनुभव आहे. तीन टर्म नगरसेवक राहिल्याने अमेय घोले यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. तसेच त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली होती. अमेय घोले हे एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात.



आणखी वाचा


मोठी बातमी: विधानपरिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला, दुसऱ्या जागेवर धक्कातंत्राचा वापर करणार?




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.