बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






आजरा येथील वाणी गल्ली परिसरात एका जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. डॉ. देशपांडे यांच्या जुन्या घराची दक्षिणेकडील रस्त्यालगतची भिंत अचानक कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाले आहे.  वैष्णवी तुकाराम भोसले (14) आणि प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार (45) असे मृत मुलगी आणि महिलेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, वाणी गल्लीतील या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला. भिंत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा रस्त्यावर आला, ज्याखाली वैष्णवी आणि ज्योती कुंभार या दोघी दबल्या गेल्या. या दुर्घटनेत ललिता तुकाराम भोसले (42) या महिला देखील गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आजरा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.