रायगड क्राईम न्यूज : रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाइन जुगारामध्ये तरुण कर्जबाजारी झाला होता. त्यामुळं तो चोरी करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होता. अखेर रायगड पोलिसांनी या तरुणाला अटक करण्यात आली आहे. महागडे मोबाईल महागडे वाहन वापरण्यावरून  पोलिसांना संशय आला होता. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तरुणावर नागोठणे पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलं आहे.


रमी खेळून त्याने स्वतःवर मोठ कर्ज करून ठेवलं होतं


ऐकावं तर नवलच अशी घटना रायगडमधून समोर येत आहे. रायगडच्या बेनसे परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने ऑनलाइन रमी खेळून अंगावर झालेले कर्ज फेडण्यासाठी चक्क घरफोड्या, चोऱ्या करण्याचा मार्ग अवलंबला होता. अखेर रायगड पोलिसांचा ताब्यात तो सापडला आहे. अक्षय कुथे वय वर्ष 23 असं या तरुणाचे नाव असून अक्षय हा सुरुवातीपासून रमी ऑनलाइन जुगार खेळायचा. मात्र रमी खेळून त्याने स्वतःवर मोठ कर्ज करून ठेवलं होत. आता केलेल कर्ज परतफेड कसे करणार?  या भीतीने त्याने पेण तालुक्यातील शिहू, बेनसे, मुंढाणी, झोतीरपाडा परिसरातील घरांमध्ये दरोडा टाकून अनेक वेळा चोरी केली आहे. मात्र वाढते चोरीचे सत्र लक्षात घेता स्थानिक नागरिकांना अक्षयच्या कर्ज बाजारी आणि महागड्या गाड्या महागडे मोबाईल वापरण्यावरुन पोलिसांना त्याची भनक लागताच अखेर यशस्वी सापळा रचून पोलिसांनी अक्षय याला ताब्यात घेतलं.


कर्ज असल्याने ही पाऊल उचलल्याची आरोपीनं दिली कबुली


आरोपी अक्षय याने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. आपण आपल्यावर कर्ज असल्याने ही पाऊल उचलल्याची कबुली दिलीय. त्यानंतर पोलिसांनी अक्षय याच्यावर चोरी प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल केले आहेत.


स्मशानभूमीत अत्यांविधी केलेल्या महीलेची राख चोरीला



धाराशिव जिल्ह्यातील तुलजापुरात देखील एक धक्कादायक प्रकरा घडला आहे. स्मशानभूमीत अत्यांविधी केलेल्या महीलेची राख चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. तुळजापूमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुळजापुरातील आरधवाडी गल्ली भागातील वंदना जाधव यांच 18 एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. राख सावडण्यासाठी कुटुंबीय गेले असता राख चक्क चोरी केल्याचा प्रकार उघकीस आला आहे. अंत्यविधी केल्या नंतर राख चोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरील प्रकरणाचा सखोल तपास करण्याची कुटुंबीयांची मागणी, पोलिसात देखील तक्रार देणार




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.