मुंबई : पावसाळ्यात दरवर्षी जलमय होणाऱ्या आणि मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीला अडथळा ठरणारा चुनाभट्टी परिसर पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानंतर या परिसरात मिनी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. येत्या १५ मेपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


दरवर्षी पावसाळ्यात चुनाभट्टी स्थानक परिसर, गंगाधर कोबे मार्ग, गुलमोहोर लेन आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्याचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसतो. परिणामी रेल्वे वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होते.

Mumbai News: विकासासाठी कृती आराखडा, विविध विभागांना मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

पूर्वी या भागात पंप लावून येथील साचलेले पाणी राहुलनगर नाल्यात टाकले जात असे; मात्र तेच पाणी पुन्हा उलट फिरून त्याच परिसरात साचत होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आयुक्त अश्विनी भिडे यांनी नुकतीच या परिसराची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

नवी यंत्रणा कशी आहे?

  • शक्तिशाली पंप : पाणी साचण्यासाठी दोन खड्डे तयार केले जातील. त्यात पाणी सोडून ते पुन्हा बाहेर फेकण्यासाठी दोन ठिकाणी प्रत्येकी तीन अशा एकूण सहा पंपांची उभारणी केली जाईल. एका पंपाची क्षमता तीन हजार घनमीटर प्रति तास इतकी असेल.


  • पोलादी जलवाहिनी : आयडीएमआय ते राहुलनगर नाल्यादरम्यान ७०० मीटर लांबीची आणि ९०० मिलीमीटर व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकली जाणार आहे.


  • थेट निचरा : या वाहिनीच्या माध्यमातून चुनाभट्टीतील पाणी थेट माहूलच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या नाल्यात सोडले जाईल. त्यामुळे ते पुन्हा उलट फिरण्याचा धोका राहणार नाही.


Mumbai local: मुंबईकरांचा थरकाप! पावसात ठप्प लोकल, मध्य रेल्वे ३० मिनिटे लेट; ठाणे-कल्याणमध्ये जीव धोक्यात टाकून प्रवास

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.