भुसावळ मंडळातील पारस–गायगाव–अकोला येथे अप व डाऊन अशा दोन्ही रेल्वे मार्गांवर देखभाल व दुरुस्तीचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी २३ एप्रिल, गुरुवारी विशेष वाहतूक बंद ठेवली जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बडनेरा जंक्शनमार्गे धावणाऱ्या अनेक प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.


रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी गाडी क्रमांक १११२१ भुसावळ–वर्धा मेमू, गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा–भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ६११०१ भुसावळ–बडनेरा मेमू आणि गाडी क्रमांक १११२२ वर्धा–भुसावळ मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गाडी क्रमांक २०८२० ओखा–पुरी एक्सप्रेस ही शेगाव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान सुमारे २ तास २५ मिनिटे उशिराने धावणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक ११०४० गोंदिया–कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास २० मिनिटे उशिराने धावणार आहे.

Sahyadri Express Railway Route : सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे मार्गात मोठा बदल, कोल्हापूर-पुणे खडकीपर्यंतच धावणार रेल्वे; मुंबईच्या प्रवाशांचे होणार हाल

याशिवाय गाडी क्रमांक १२४८५ हजूर साहिब नांदेड–श्री गंगानगर एक्सप्रेस ही काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास उशिराने धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन केले आहे. अचानक होणाऱ्या बदलांमुळे प्रवाशांनी पर्यायी नियोजन करूनच प्रवास करावा, असेही सूचित करण्यात आले आहे. विशेषतः कामानिमित्त किंवा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेस बंद; महाराष्ट्रातील ट्रेन सेवा कमी, यूपी-बिहारसाठी स्पेशल गाड्यांचा पाऊस

रेल्वेच्या या कामामुळे काही काळ गैरसोय होणार असली तरी भविष्यातील सुरक्षित व सुरळीत रेल्वे वाहतुकीसाठी ही कामे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सहकार्याची अपेक्षा रेल्वेकडून करण्यात आली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.