MARATHI TV STARS ANUSHKA SARKATE AND NIKHIL CHAVAN ENGAGED: मराठी मनोरंजनविश्वातील असे अनेक कलाकार आहेत जे लग्नबंधनात अडकले आहे. गेल्या वर्षभरात मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली. त्यातील अपुर्वा नेमळेकर, गौरव मोरे, सह अनेक सेलिब्रिटी संसाराला लागले आहेत. दरम्यान अशातच आता मालिकाविश्वातील प्रसिद्ध जोडीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.


स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे हिचा साखरपुडा झाला आहे. तिने अभिनेता निखिल चव्हाण यांच्यासोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अनुष्का आणि निखिल यांनी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कारभारी लयभारी'मध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.


दरम्यान मालिकेतील जोडी आता खऱ्या आयुष्यात सुद्धा लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या अनुष्का आणि निखिल यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय नेते विनोद पाटील यांनी अनुष्का आणि निखिल यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.





View this post on Instagram

A post shared by Viinod Shoba Naryan patil (@vinodpatil.official)