जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील घंगाळदरे येथील शेतकरी कुटुंबातील रोहन प्रदीप तळपे याची महाराष्ट्र पोलिस दलात निवड (Rohan Talpe Maharashtra police selection story) झाली. धाराशिव येथे त्याची निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन दुसऱ्याच प्रयत्नात पोलिस भरतीमध्ये यश मिळविल्याबद्दल रोहन याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
जुन्नरच्या पश्चिम भागातील घंगाळदरे येथील असणाऱ्या रोहन याचे वडील प्रदीप देवजी तळपे व आई अर्चना तळपे यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. रोहन याने सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेतले. तर, माध्यमिक शिक्षण जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर येथे घेतले. पदवीपर्यंतचे शिक्षण जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयात पूर्ण केले.
Snehal Lokhande MPSC Success Story : पुण्याची लेक चमकली! मरकळच्या शेतकरी कन्येची भरारी; एकापाठोपाठ एक 3 सरकारी नोकऱ्या मिळवत स्नेहल लोखंडेची कमालरोहन याची पोलिस दलात जाण्याची तीव्र इच्छाशक्ती होती. त्यासाठी त्याने शालेय जीवनापासूनच सराव सुरू केला. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले मात्र त्याने सरावात सातत्य टिकवून ठेवल्याने त्याला दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त झाले. शेतकरी कुटुंबातील रोहन याने कष्टकरी आई वडिलांचे पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याने स्थानिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.