मसूर : निगडी (ता. कराड) येथील काजल सुनील घोलप हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर रेल्वे क्षेत्रात इतिहास घडवला आहे. इंडियन रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदावर निवड होऊन तिने निगडी गावाच्या इतिहासात पहिली महिला (kajal gholap indian railways success story) म्हणून मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


वयाच्या २७ व्या वर्षी काजलने हे यश मिळवत शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी एकाच वेळी यशस्वीरीत्या पूर्ण केली. तिचे शालेय शिक्षण मसूरच्या शिवाजी विद्यालयात झाले. त्यानंतर कऱ्हाड येथील शासकीय कॉलेजमधून डिप्लोमा पूर्ण करून अहिरे कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेची पदवी तिने मिळवली.

Snehal Lokhande MPSC Success Story : पुण्याची लेक चमकली! मरकळच्या शेतकरी कन्येची भरारी; एकापाठोपाठ एक 3 सरकारी नोकऱ्या मिळवत स्नेहल लोखंडेची कमाल

विशेष म्हणजे, डिग्रीला प्रवेश घेतल्यापासूनच तिने असिस्टंट लोको पायलट परीक्षेची तयारी सुरू केली होती. दररोज सरासरी आठ तास अभ्यास करत तिने हे यश मिळवले. तिचे वडील शेतकरी आहेत. शिक्षणादरम्यान अनेक आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक संकटांना सामोरे जात तिने पार्टटाइम नोकरी करत शिक्षण पूर्ण केले.

मणक्याच्या त्रासावर योगासनांद्वारे मात

काजलला रेल्वे क्षेत्रात जाण्याची प्रेरणा गावातीलच रेल्वेत कार्यरत असलेले तिचे चुलत भाऊ प्रकाश घोलप यांच्याकडून मिळाली. तिच्या आयुष्यात एक कठीण टप्पा असा आला, की सततच्या अभ्यासामुळे तिला मणक्याचा त्रास निर्माण झाला होता. त्या वेळी स्वप्न अपूर्ण राहील असे वाटले होते; मात्र आई-वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे तिने हार मानली नाही. विशिष्ट योगासने करून आपला त्रास दूर केला आणि या जिद्दीच्या बळावरच ती आज असिस्टंट लोको पायलट पदापर्यंत पोहोचली आहे.

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

माझे आई-वडील हेच माझे आदर्श आहेत. त्यांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. घरची परिस्थिती बेताची असतानाही अनेक अडचणी, आर्थिक संकटे आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाताना त्यांनी मला नेहमी धीर दिला. त्यांच्या विश्वासामुळेच मी आज हे स्वप्न पूर्ण करू शकले. गावातील प्रत्येक मुलीने मोठी स्वप्ने पाहावीत आणि मेहनतीच्या जोरावर ती पूर्ण करावीत.


-काजल घोलप

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.