बीडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली


बीडमधील मुलगा सावत्र आईसोबत पळाल्याची घटना उघडकीस


बीडमधील प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ


योगेश काशिद, साम टीव्ही


बीडच्या केज तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या केजमधील एका गावात एका जोडप्याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झाली आहेत. कौटुंबीक वादामुळे या व्यक्तीची पत्नी मागील पंधरा वर्षांपासून विभक्त राहतेय. त्याची दोन्ही मुले वडिलांकडे राहत आहेत. ते शेती करतात. कौटुंबीक अडचणीमुळे या व्यक्तीने मागील चार वर्षांपूर्वी एका परित्यत्ता महिलेसोबत दुसरे लग्न केलं. केजमधील हा व्यक्ती पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले आणि त्याची दुसरी पत्नी हे एकत्र राहत होते. परंतु वासनेची हवा डोक्यात गेलेल्या मुलाने सावत्र आईसोबत पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.


केजमधील व्यक्ती १२ एप्रिल रोजी मुंबई येथील रत्नेश्वरी देवीच्या देवदर्शनासाठी यात्रेला गेला होता. त्यावेळी सावत्र आई आणि तिच्या सवतीचा मुलाचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमात वासनेने आंधळी झालेली चाळीस वर्षांची महिला १५ एप्रिल रोजी नवऱ्याला सोडून सवतीच्या मुलासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे करीत आहेत.

लव्ह, सेक्स आणि धोका! पालघरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, बीडच्या तरूणाने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले

महिलेच्यानवऱ्याने पोलिसांत जाऊन दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. एका बाजूला पळून गेलेली बायको, तर दुसऱ्या बाजूला पळवून नेणारा मुलगा. पळून जाताना पीडित व्यक्तीच्या जावयाची दुचाकी नेली आहे. त्यामुळे केजमधील व्यक्ती तिहेरी कचाट्यात बाप अडकला आहे.


प्रेमीयुगुल दुसऱ्या राज्याचे


सावत्र आणि आणि मुलगा यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली मोटार सायकल ही त्या व्यक्तीच्या सावत्र जावयाच्या नावावर नोंद आहे. त्यामुळे त्यांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या मोटार सायकलीने वाहतुकीच्या नियमांचा भंग केला. त्यामुळे १६ एप्रिल रोजी सकाळी तेलंगणा राज्यात वाहतूक पोलिसांनी इंदिरा नगर, गच्चीबोली येथे १ हजार २३५ रुपयांचा दंड केलेला असल्याचे मेसेज देखील आला आहे.

Chandrapur : नाशिकनंतर चंद्रपूरमध्ये अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण; मोठ्या रॅकेटचा पर्दाफार्श

नात्याचा जांगडगुत्ता


बायकोला पळवून नेणारा मुलगा तर पळून जाण्यासाठी वापरलेली मोटार सायकल जावयाची होती. या प्रकरणानंतर पीडित व्यक्तीने आता बायकोला सून म्हणावे की, बायको,असा नात्याचा जांगडगुत्ता झाला आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.