संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी
Indian Railways latest updates : अकोल्यात नॉन-इंटरलॉकिंगसाठी गुरूवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम भुसावळ रेल्वे विभागावर पडणार आहे. कारण, शेगाव-बुलढाणाकडे धावणाऱ्या सर्व रेल्वे पॅसेंजर गाड्या गुरूवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक एक्सप्रेस गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा परिणाम वर्धा, भुसावळ, बडनेरा या पॅसेंजरवर पडणार आहे. तर काही एक्सप्रेस गाड्याही रद्द होणार आहेत. त्यामुळे शेगावला दर्शनासाठी जात असाल तर आधीच प्रवासाचे नियोजन करावे.
भुसावळ विभागातील पारस-गायगाव-अकोला दरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गावर ऑटोमॅटिक ब्लॉक सेक्शनच्या कामासाठी 'नॉन-इंटरलॉकिंग' विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी काही प्रवासी गाड्या रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे नियमन (विलंब) करण्यात येणार आहे.
LPG सिलिंडरसाठी पुन्हा नवा नियम, गॅस हवा तर द्यावा लागणार DAC नंबर, सरकारनं का घेतला निर्णय?रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १११२१ भुसावळ-वर्धा मेमू, गाडी क्रमांक ६११०२ बडनेरा-भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ६११०१ भुसावळ-बडनेरा मेमू तसेच गाडी क्रमांक १११२२ वर्धा-भुसावळमेमू या गाड्या रद्द करण्यात येत आहेत. याशिवाय काही गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २०८२० ओखा-पुरी एक्स्प्रेस ही शेगाव ते श्रीक्षेत्र नागझरी दरम्यान सुमारे २ तास २५ मिनिटे उशिराने धावेल.
IPS transfer : पुण्यातील IPS शिंदे-पिंगळेंची बदली, आता कुठे मिळाली नियुक्ती? वाचा सविस्तरगाडी क्रमांक ११०४० गोंदिया-कोल्हापूरएक्स्प्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास २० मिनिटे विलंबित राहील. तसेच गाडी क्रमांक १२४८५ हजूर साहिब नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान सुमारे २ तास विलंबाने धावेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, ही कामे पायाभूत सुविधांच्या देखभाल व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Vande Bharat Express : मुंबईहून सुटणाऱ्या वंदे भारतच्या वेळापत्रकात मोठा बदल, वाचा सुधारित वेळ काय?Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.